जाहिरात

Ahilyangar News: आजीसोबत निघालेला ओमकार गायकवाड घरी परतलाच नाही..भयंकर घटनेमुळं अहिल्यानगर हळहळलं

राहता शहरात एका 13 वर्षीय चिमुकल्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे.‘डफ’चा खेळ पाहण्यासाठी आजीसोबत निघालेल्या ओमकार गायकवाड या मुलाला भरधाव कारने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली.

Ahilyangar News: आजीसोबत निघालेला ओमकार गायकवाड घरी परतलाच नाही..भयंकर घटनेमुळं अहिल्यानगर हळहळलं
Ahilyanagar Car Accident News

सुनील दवंगे, प्रतिनिधी 

Ahilyanagar Car Accident News :.‘डफ'चा खेळ पाहण्यासाठी आजीसोबत निघालेल्या ओमकार गायकवाड या मुलाला भरधाव कारने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली. कार चालकाने गाडी पुन्हा रिव्हर्स घेत ओमकारच्या अंगावर घातली,असा गंभीर आरोप कुटुंबीयांनी केला आहे. उपचारादरम्यान ओमकारचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी थेट राहाता पोलीस स्टेशनसमोर मृतदेह आणला आणि न्यायाची मागणी केली.हा केवळ अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. 

राहाता शहरातील सावता माळी गल्ली परिसरात गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.ओमकार गायकवाड हा त्याच्या आजीसोबत ‘डफ'चा खेळ पाहण्यासाठी शनी चौकाच्या दिशेने निघाला होता.रणभोर चौकातून वळण घेत असताना भरधाव वेगात आलेल्या  कारने आधी ओमकारच्या आजीला धडक दिली आणि त्यानंतर ओमकारला उडवले.

नक्की वाचा >> Missing Link News : मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचा श्वास मोकळा, 'या' घाटाचा प्रवास टाळता येणार

ओमकार रस्त्यावर पडला होता, पण कार चालकाने..

प्रत्यक्षदर्शी आणि कुटुंबीयांच्या माहितीनुसार,ओमकार रस्त्यावर पडला. त्यानंतरही कार चालक थांबला नाही.उलट गाडी पुन्हा मागे-पुढे घेत त्याच्या पोटावरून चाक गेल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.या घटनेत गंभीर जखमी झालेल्या ओमकारला तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र उपचार सुरू असताना आज सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

ओमकारचा मृत्यू हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक घडवून आणलेला प्रकार असल्याचा आरोप त्याचे आजोबा पांडुरंग गायकवाड आणि कुटुंबीयांनी केला आहे.“आमचे कोणाशीही वैर नाही,आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत.मग आमच्या चिमुकल्यासोबत असं का घडलं?”असा सवाल करत त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.ओमकार हा कुटुंबातील एकुलता एक नातू असल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नक्की वाचा >> Instagram वर मुस्लीम मुलीचं हिंदू तरुणीसोबत जडलं प्रेम, लग्नाचा निर्णय घेताच कुटुंबीयांची सटकली अन्..

घटना घडल्यानंतर सावता माळी गल्लीतील नागरिकांनी आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींनी तातडीने राहाता पोलीसांना माहिती दिली,असा दावा केला जात आहे.मात्र पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.या घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी राहाता पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मृत ओमकारचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट पोलीस स्टेशनसमोर आणण्यात आला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com