जाहिरात
This Article is From Sep 08, 2024

बदलापूरात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर अत्याचार, गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रीणीसह तिघांना अटक

वैद्यकीय चाचणी केली, यात या तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. तरुणीवर बलात्कार एका मित्राने केला की दोघांनी केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

बदलापूरात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर अत्याचार, गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रीणीसह तिघांना अटक

निनाद करमरकर, बदलापूर

मैत्रिणीकडे वाढदिवसाच्या पार्टीसाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्याच परिचित दोन तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करत तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण आणि तिच्या दोन मित्रांना अटक केली आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची काही दिवसांपूर्वी शिरगाव परिसरात राहणाऱ्या भूमिका या तरुणीसोबत ओळख झाली होती. दोन दिवसापूर्वी भूमिका हिने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या दोन मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलावलं होतं. रात्री उशिरापर्यंत पार्टी केल्यानंतर भूमिका हिने पीडित तरुणीच्या पेयात गुंगीचे औषध टाकलं. त्यामुळे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर भूमिका हिच्या घरी एका मित्राने बलात्कार केला. 

(नक्की वाचा-  सासरा आणि दिरासह तिघांकडून महिलेवर अत्याचार, टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना)

दुसऱ्या दिवशी सकाळी आपली मुलगी घरी परत न आल्याने तिच्या पालकांनी भूमिकाला संपर्क केला. त्यावेळी तुमची मुलगी मद्यप्राशन करून पडल्याचं भूमिकाने सांगितलं. त्यामुळे पालकांसोबत घरी परतलेल्या पीडित तरुणीला शुद्ध आल्यानंतर आपल्यावर बलात्कार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. याबाबत तिने तिचे पालक आणि पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तरुणीची वैद्यकीय चाचणी केली, यात या तरुणीवर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. 

(नक्की वाचा-  कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड? ऐन गणपतीत नदी काठी आढळले तिघांचे मृतदेह)

तरुणीवर बलात्कार एका मित्राने केला की दोघांनी केला? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी पीडित तरुणीला गुंगीचं औषध देणारी मैत्रीण भूमिका मेश्राम, साताऱ्याहून आलेला शिवम राजे(22 वर्ष) आणि संतोष रुपवते (40 वर्ष) या तिघांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: