जाहिरात

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; गेल्या 5 वर्षात काय घडलं? सगळं समोर येण्याची शक्यता

गेल्या पाच वर्षांपासून आपण मोबाईलवरुन तरुणीच्या संपर्कात होतो, अशी माहिती आरोपी दाऊद शेखने पोलिसांना दिली आहे. तोच मोबाईल आता पोलिसांना सापडला आहे.

यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; गेल्या 5 वर्षात काय घडलं? सगळं समोर येण्याची शक्यता

रायगडमधील उरण येथील यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांच्या हाती आरोपी दाऊद शेख विरोधात महत्त्वाचा पुरावा सापडला आहे. यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊद शेखनं पनवेलमधून कर्नाटकातील गुलबर्ल्याला गेला. तिथून त्याला पाच दिवसांनी पोलिसांनी अटक केली होती. आरोपींनी तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले होते. यशश्री आणि मी अनेक वर्षांपासून संपर्कात होतो, अशी माहिती आरोपीने दिली होती. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

आरोपीच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे हे आता पोलिसांना तपासता येणार आहे. तसेच यशश्री आरोपी दाऊद यांच्यात नेमका काय संवाद होत असे याची देखील माहिती पोलिसांना मिळू शकणार आहे. कारण या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या हाती मृत तरुणीचा मोबाईल लागला आहे. गेल्या पाच वर्षांपासून आपण मोबाईलवरुन तरुणीच्या संपर्कात होतो, अशी माहिती आरोपी दाऊद शेखने पोलिसांना दिली आहे. तोच मोबाईल आता पोलिसांना सापडला आहे.

मोबाईल सापडल्यामुळे पोलीस तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेला कोयता आरोपीने रेल्वे प्रवासादरम्यान फेकून दिला होता. पोलिसांनी या भागात शोधाशोध केल्यावर त्यांना कोयता सापडला आहे. पण तरुणीचा मोबाईल बरेच दिवस सापडला नव्हता. अखेर पोलिसांच्या हाती तो मोबाईल लागला आहे.

(नक्की वाचा- यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; गेल्या 5 वर्षात काय घडलं? सगळं समोर येण्याची शक्यता)

लग्नास नकार दिल्याने हत्या?

यशश्रीने लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आल्याचं दाऊदकडून सांगितलं जात आहे.  यशश्रीच्या वडिलांनी 2019 मध्ये आरोपी दाऊदविरोधात पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो सुमारे दीड महिना तुरुंगात होता. त्यानंतर त्याचा अपघात झाला होता. सुमारे दीड महिना तो अंथरुणाला खिळून होता. प्रकृती सुधारल्यानंतर त्याने पीडितेशी पुन्हा संपर्क साधला आणि संभाषण सुरू केले. यशश्रीच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी त्याने हत्येचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे.

(नक्की वाचा-  यशश्री इच्छेने दाऊदला भेटायला गेली होती? पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतर उरण हत्याकांडाला वेगळं वळण  )

ब्लॅकमेल करुन भेटायला बोलावलं

आरोपी दाऊदकडे या दोघांचे काही खाजगी फोटो होते. ते फोटो कोणी पाहू नये अशी यशश्रीची इच्छा होती. मात्र आरोपीने तरुणीला तो फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.  यानंतर 24 जुलै रोजी जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ तो तरुणीला भेटला. यानंतर आरोपीने तिला 25 जुलैला सतत फोन करून भेटायला बोलवलं. ती भेटायला तयार नव्हती, तेव्हा त्याने तो फोटो त्याच्या फेसबुकवर टाकला. फोटो पाहताच तिने पुन्हा भेटायला होकार दिला. आरोपींने पोलिसांना सांगितले की, भेटल्यावर यशश्रीने फेसबुकवरून फोटो डिलिट करण्यास सांगितले आणि त्याने फोटो डिलिट केला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि तरुणीनेही आपल्या मित्राला मदतीसाठी बोलावून आपण अडचणीत असून मदतीची गरज असल्याचे सांगितले. दरम्यान आरोपीने चाकूने यशश्रीची हत्या केली.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
यशश्री शिंदे हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; गेल्या 5 वर्षात काय घडलं? सगळं समोर येण्याची शक्यता
CIDCO Navi mumbai  Lottery CIDCO New Lottery Announcement, Why Buy a CIDCO Home
Next Article
सिडकोचेच घर का खरेदी कराल? नव्या लॉटरीत 'ही' आहे खास गोष्ट