
Jalgaon News : भाजप आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत अनिल परब यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे. चित्र वाघ यांनी रोहिणी खडसेंच्या टीकेला उत्तर देताना "वडिलांना विचारा" असं म्हटलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत म्हटलं की, "माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी. ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय. याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं"
माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी ! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय… याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं...
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 22, 2025
तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या…
"तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते," याची आठवण रोहिणी खडसे यांनी करुन दिली.
(नक्की वाचा- Crime News : प्रशांत कोरटकर दुबईत की तपास भरकटवण्याचा प्रयत्न? जुन्या इन्स्टा पोस्टमुळे संशय बळावला)
"चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधानपरिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत. विचारा तुमच्या वरिष्ठांना... शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकांपर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रवास आजतागायत सुरूच आहे. यात कधी त्यांनी आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही. त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला… उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको", असं रोहिण खडसे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार)
बाईईईईई काय हा प्रकार... थोडं थोडं साम्याच आहे, नाही ! पण कोणीतरी सांगा ते आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे.. बिग बॉसचा एखादा सीजन नाही!!#चित्रविचित्र #Maharashtra pic.twitter.com/QGYajJ7YXV
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 20, 2025
काय आहे प्रकरण?
विधानपरिषदेतील शाब्दिक बाचाबाचीनंतर चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधताना रोहिणी खडसे यांनी त्यांची बिग बॉसमधील भांडणांशी तुलना केली होती. या ट्वीनंतर चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं की, "रोहिणी खडसे यांचे वडील विधानपरिषदेत माझ्या समोर बसतात. त्यांनी त्यांना विचारावं, ते जास्त चांगलं सांगतील."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world