जाहिरात

Political News : ठाकरे गटाचे आमदार-खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; शिवसेना नेत्याचा दावा

Shivsena News : शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दावा केला होता की, राज्यातील विरोधी काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मधील 10 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत.

Political News : ठाकरे गटाचे आमदार-खासदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात; शिवसेना नेत्याचा दावा

शिवसेना ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारी माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 5 आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ शिवसेना ठाकरे गटच नाही तर काँग्रेसचे काही नेते देखील शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील  काही आमदार बंडखोरी करु शकतात असा दावा केला होता.  आरोप आरोपांना उदय सामंत यांनी उत्तर दिलं. शिवसेना ठाकरे गटातील अनेक खासदार आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. 

दावोस राजकारणाची जागा नाही- संजय राऊत 

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दाव्याला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेते किती आमदार, खासदार फुटतील हे दावोसमधून सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनी उदय सामंत यांना दावोसमधून तातडीने राज्यात पाठवले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सामंताकडून खर्च वसूल केला पाहिजे. दावोस राजकारण करण्याची जागा आहे का? असा सवालही संजय राऊत यांनी केला.

(नक्की वाचा-  Bacchu Kadu : शरद पवार-उद्धव ठाकरे केंद्रात भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा मोठा दावा)

शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी दावा केला होता की, राज्यातील विरोधी काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मधील 10 ते 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. 23 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात सामील होतील.

शेवाळे यांनी पुढे म्हटलं की , "23 जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून, त्यात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे 10 ते 15 आमदार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होतीत. मात्र संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार खोट्या बातम्या पसरवत आहेत. 

(नक्की वाचा-  Maharashtra Politics: संजय राऊतांना काळे फासणाऱ्यास 1 लाखांचे बक्षीस, कुणी केली घोषणा? कारण...)

विजय वडेट्टीवार यांची टीका

उद्धव ठाकरे यांना संपवून शिंदेंना आणलं. आता शिंदेंना संपवून नवीन 'उदय' पुढे येईल. तो उदय कुठला असेल. त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न असेल. ही शिवसेनेच्या बाबतीतली सध्याची परिस्थिती आहे, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: