राहुल कुलकर्णी, पुणे
Pune Astrological Conference : पुणे शहरात 43वे अखिल भारतीय ज्योतिष संमेलन पार पडले. या संमेलनात देशभरातील अनेक प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक आणि ज्योतिषी सहभागी झाले होते. त्यांनी ज्योतिषशास्त्राच्या विविध पद्धती आणि त्यांचा मानवी जीवनावरील प्रभाव याबद्दल माहिती दिली. या संमेलनातून सध्याचे राजकारण आणि सामान्य लोकांच्या जीवनाशी संबंधित अनेक विषयांवर भाकीत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अजित पवार यांच्या राजकीय भवितव्याबद्दलही या संमेलनात भाकीत करण्यात आले.
एका ज्योतिष अभ्यासकाने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्रिका येवढी मजबूत होती, की त्यांनी सगळा भारत कॅप्चर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची पत्रिका अत्यंत मजबूत आहे. त्यांनी असा अंदाज व्यक्त केला की, पुढील काही वर्षांत मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि ते अज्ञातवासात जातील.
(नक्की वाचा- Mobile Numerology : तुमचा मोबाईल नंबर सांगतो तुमचं भविष्य! लग्न ते आरोग्य सर्व प्रश्नांची मिळतील उत्तरं)
राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भवितव्याबद्दलही ज्योतिष अभ्यासकांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस हे एक 'लंबी रेस का घोडा' असून ते दिल्लीकडे वाटचाल करतील. दिल्लीत ते मोठ्या पदावर काम करतील, असं भाकित वर्तवलं. तर अजित पवारांची संघर्षाची पत्रिका आहे. अजित पवार त्यांना खूप संघर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळेल, असंही भाकित ज्योतिष अभ्यासकांनी वर्तवलं.
उद्धव ठाकरे यांची सद्यस्थिती कितीही वाईट असली तरी त्यांना हलक्यात घेऊ नये. त्यांच्यासाठी कठीण काळ असला तरी, राजकारणात त्यांचे अस्तित्व टिकून राहील. मात्र राज ठाकरेंना काहीही अतित्व नाही, असं ज्योतिष अभ्यासकांनी सांगितलं.