अविनाश पवार
आपण नेहमीच ऐकतो भ्रष्टाचाराने देश पोखरला आहे. पण भ्रष्टाचार किती भयानक स्वरूपात समाजाला छळतो हे समोर येतं, जेव्हा सामान्य माणूस विशेषतः एक शिक्षक आपलं काम करून घेण्यासाठी स्वतःचे दागिने गहाण ठेवतो, उसने पैसे घेतो, तेही फक्त सरकारी कागदपत्र मिळवण्यासाठी. हा प्रकार जेव्हा समोर आला त्यावेळी भ्रष्टाचाराने ही व्यवस्था किती पोखरली आहे याची अंदाज येतो. ही सर्वांनाच विचार करायला लावणारी आणि हादरवून सोडणारी घटना पुण्यात घडली आहे. त्याबाबच विशेष वृत्त आपण जाणून घेणार आहोत.
पुण्यात आज बुधवारी अशाच एका प्रकरणावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं. यामागचं सत्य आणखीच वेदनादायी आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शिक्षकाला त्याचा शालार्थ आयडी मिळवून देण्यासाठी तब्बल 1 लाखाची लाच मागितली गेली होती. सरकारी नोकरीत असलेल्या या शिक्षकासाठी एवढी मोठी रक्कम जमवणं अशक्य होतं.
पण आपल्याला शालार्थ आयडी गरजेचा आहे. तो नसेल तर आपलं नुकसान होणार आहे हे त्या शिक्षकाला ही माहित होतं. त्यामुले ऐपत नसतानाही काही करून एक लाख रूपये जमा करण्याची तयारी त्याने सुरू केली. मग आधी या शिक्षकाने आपल्या घरातील दागदागिने गहाण ठेवले. त्यातून ही पुरेसे पैसे मिळाले नाहीत. मग नातेवाईकां पुढे हात पसरले. त्यांच्याकडून त्यांनी उसने पैसे घेतले. सर्व पैसे जमा झाले होते. तरी मन शांत नव्हतं. अशा वेळी नातेवाईकांनी धीर दिला.
नक्की वाचा - Tata Sierra: टाटा सिएराची धमाकेदार एन्ट्री! किंमत, फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल,'आहा!,
तुम्ही शिक्षक आहात. भ्रष्टाचाराला बळी पडू नका. याची तक्रार करा असा सल्ला त्यांच्या नातेवाईकाने त्यांना दिला. मग या शिक्षकाने धाडस करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. लाचलुचपत विभागाने पूर्ण योजना आखली. ज्याने लाच मागितली होती त्या शिक्षण उपनिरीक्षक रावसाहेब मिरगणे याच्यासाठी सापळा रचला गेला. त्यानंतर त्याला रंगेहात पकडण्यात आलं. अधिकृत पंचनाम्यात मिरगणे याच्या ताब्यातून एक लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत प्रेसनोटमध्ये देण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world