जाहिरात

Pune News: गणेशोत्सव काळात पुण्यात 'या' भागात जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी

शहरात फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने वगळून इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

Pune News: गणेशोत्सव काळात पुण्यात 'या' भागात जड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी
पुणे:

शहरात गणेश उत्सव काळात नागरिकांची साहीत्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यावेळी रस्त्यांवरून धावणाऱ्या जड-अवजड वाहनांमुळे नागरिकांना असुरक्षितता निर्माण होवून शकते. शिवाय त्यातून जिवीतास धोका होवू नये यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. या काळात पुणे शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी घातली आहे. शहरात फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका, गणेश देखावे वाहतूक करणारी वाहने वगळून इतर वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्या बाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.  

नक्की वाचा - Political news: सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल! शिंदेंच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री नाराज?

25 ऑगस्ट ते 07 सप्टेंबर 2025 पर्यंत  पुण्यातील पुढ्यील  रस्त्यांवर जड- अवजड वाहनांच्या वाहतूकीस 24 तास बंदी करण्यात आली आहे. त्यानुसार शास्त्री रोड - सेनादत्त चौकी चौक ते अलका चौक, टिळक रोड - जेधे चौक ते अलका चौक,  कुमठेकर रोड - शनिपार ते अलका चौक, लक्ष्मी रोड - संत कबीर चौक ते अलका चौक, केळकर रोड - फुटका बुरुज ते अलका चौक, बाजीराव रोड - पुरम चौक ते गाडगीळ पुतळा,  शिवाजी रोड - गाडगीळ पुतळा ते जेधे चौक या मार्गवार अवजड वाहनांना पूर्ण पणे बंदी असेल असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

नक्की वाचा - Kolhapur News: देवाने वैकुंठाला जाण्याचा दिला आदेश, 20 जण करणार देहत्याग? नक्की प्रकार काय?

त्याच बरोबर कर्वे रोड - नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड - खंडोजीबाबा चौक ते विर चाफेकर चौक, जंगली महाराज रोड - स.गो. बर्वे चौक ते खंडोजीबाबा चौक,  सिंहगड रोड - राजाराम ब्रिज ते सावरकर चौक, गणेश रोड / मुदलियार रोड – पॉवरहाऊस – दारुवाला - जिजामाता चौक - फुटका बुरुज चौक या प्रमाणे करण्यात आलेल्या वाहतुक बदलांचा अवलंब करून गणेशोत्सव शांततेने पार पाळण्यास व वाहतुक सुरळीत ठेवण्यास पुणे शहर वाहतुक पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहनह करण्यात आले आहे.  पोलीस उप आयुक्त, वाहतुक शाखा पुणे शहर, हिंमत जाधव यांनी हे आवाहन केले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com