जाहिरात

Pune News: पुण्यात आता नवीन 'माया' गँग, बाजीराव रोडवर भर दिवसा केला अल्पवयीन मुलाचा खून

तिन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून ते सर्व जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे.

Pune News: पुण्यात आता नवीन 'माया' गँग,  बाजीराव रोडवर भर दिवसा केला अल्पवयीन मुलाचा खून
पुणे:

रेवती हिंगवे

पुण्यात कोंढवामध्ये झालेलं गणेश काळेच्या हत्येचं प्रकरण ताज आहे. त्यात पुण्यातील अगदी वर्दळीच्या भागात म्हणजेच बाजीराव रोडला एका अल्पवयीन मुलावर कुकरीने वार करून त्याचा निर्घुण खून करण्यात आला. ही घटना दुपारी सव्वा तीन वाजता घडली. या अल्पवयीन तरुण अवघ्या 17 वर्षांचा आहे. त्याच्यावर इतके वार करण्यात आले की त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्लानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सर्वत्र धावाधाव झाली. पुण्यात होणाऱ्या अशा एकामागून एक घटनांमुळे सर्वच जण हादरले आहे.  

दुपारी 3:15 मिनीटांनी हा हल्ला करण्यात आला. मयंक खरारे याच्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यासाठी तीन आरोपी एका दुचाकीवर आले होते. त्यांनी या तरुणाला हेरले. त्यानंतर  त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि मानेवर वार केले. यावेळी  सोबतचा मित्र अभिजीत इंगोळे ही होता. तो अठरा वर्षाचा आहे. डोळ्यासमोर इतका खतरनाक हल्ला झालेला पाहून तो हादरला. स्वत:ला वाचवण्यासाठी त्याने तिथून पळ काढला. पण त्याच्यावर ही हल्ला झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला.  

नक्की वाचा - Pune News: भावाच्या अंत्यसंस्काराला जेलमधून कुख्यात गुंड समीर काळे पोहचला, स्मशानभूमीत ढसाढसा रडला

हल्ला करण्यासाठी आलेले आरोपी हे हल्ला करून तिथून फरार झाले. आरोपी जरी फरार झाले असले तरी त्यांची ओळख पटली आहे.  त्यातील एक जण हा  रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो पुणे शहरातून तडीपार होता. तो त्याच्या टोपण नावानेच म्हणजे माया या नावाने ही गँग चालवत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे आंदेकर कोमकर यांच्यानंतर ही नवी टोळी पुण्यात जन्माला आली आहे की काय अशी चर्चा पुण्यात रंगली आहे. 

नक्की वाचा - Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

दरम्यान या हत्या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात पुणे पोलीसांना यश आलं आहे.  तिन्ही आरोपीना अटक करण्यात आली असून ते सर्व जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर येत आहे. आता या तिन्ही आरोपींना रिमांड होमला पाठवण्यात येणार आहे. गणेश काळे याला टोळीयुद्धातून मारण्यात आल तसंच काहीस चित्र इथे दिसून आलं आहे. पुण्यात नव्यान उदयास आलेल्या या टोळीने हे कृत्य केलं आहे. माया असं या टोळीचे नाव आहे. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आगे. पुण्यात ही घटना अत्यंत वर्दळीच्या भागात घडली असून सध्या भीतीच वातावरण सर्वत्र आहे. अशा घटनांना आळा कधी बसणार असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. पण पुण्यात अशा वाढत्या घटना पाहाता सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे पोलीसांबाबतही आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com