जाहिरात

Pune News: पुण्यात मतदारांची चांदी! कुणी देतंय थायलंडची टूर, तर कुणी गुंठाभर जमीन; निवडणुकीसाठी आमिषांचा धडाका

Pune Mahapalika Election News: लकी ड्रॉमध्ये प्रथम बक्षीस म्हणून आलिशान चारचाकी गाड्या तसेच महिला मतदारांसाठी सोन्याच्या अंगठ्या आणि नथ देण्यात येणार आहेत. तसेच युवकांसाठी स्टायलिश टू-व्हीलर देण्यात येणार आहेत.

Pune News: पुण्यात मतदारांची चांदी! कुणी देतंय थायलंडची टूर, तर कुणी गुंठाभर जमीन; निवडणुकीसाठी आमिषांचा धडाका
Google Gemni AI Image

Pune News: पुणे महानगरपालिकेच्या (PMC) निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. 18 डिसेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना निघाल्यापासून इच्छुकांनी मतदारांच्या घराघरांत पोहोचण्यासाठी शक्कल लढवली आहे. यावेळी केवळ हात जोडून मते मागितली जात नसून, मतदारांना चक्क करोडपती बनवण्याची स्वप्ने दाखवली जात आहेत.

लोहगाव-धानोरीत जमिनीचे 'प्लॉट'

प्रभाग क्रमांक 1 (लोहगाव-धानोरी) मध्ये सर्वाधिक चर्चा एका इच्छुकाने दिलेल्या ऑफरची आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून मतदारांना प्रत्येकी 1100 स्क्वेअर फूटचे (1 गुंठा) 11 प्लॉट देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यासाठी रीतसर नोंदणी देखील करून घेण्यात आली आहे.

(नक्की वाचा- Santosh Deshmukh Case: "मला बोलायचंय", कोर्टाने दोनच शब्दात वाल्मीक कराडचं तोंड केलं बंद, सुनावणीत काय घडलं?)

विमाननगरमधील मतदारांना 'थायलंड वारी'

प्रभाग क्रमांक 3 (विमाननगर) मधील काही इच्छुकांनी मतदारांच्या जोडप्यांसाठी 5 दिवसांची थायलंड ट्रीप आयोजित केली आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या सहलीचे नियोजन करून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा पुण्यात रंगली आहे.

एसयूव्ही कार आणि सोन्याचे दागिने

अनेक प्रभागांमध्ये मतदारांसाठी भव्य बक्षीस योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. लकी ड्रॉमध्ये प्रथम बक्षीस म्हणून आलिशान चारचाकी गाड्या तसेच महिला मतदारांसाठी सोन्याच्या अंगठ्या आणि नथ देण्यात येणार आहेत. तसेच युवकांसाठी स्टायलिश टू-व्हीलर देण्यात येणार आहेत.

(नक्की वाचा- पुणे-मुंबई महामार्गावरील सोमटणे फाटा, वरसोली टोलनाके बंद पाडणार; आमदार सुनील शेळकेंचा इशारा)

महिला आणि तरुणींसाठी खास भेटवस्तू

महिला मतदारांची निर्णायक मते मिळवण्यासाठी 'होम मिनिस्टर'सारखे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जात आहेत. हजारो पैठणी साड्या, शिवणयंत्रे आणि मुलींसाठी सायकलींचे वाटप करून इच्छुक आपली ताकद दाखवत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com