जाहिरात

PMC Election 2026: लाडक्या बहिणींना चांदीच्या जोडव्यांचे प्रलोभन, भावांसाठी आणलेली 1 कोटींची दारू जप्त

Pune Police: ​पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण शहराची 143 सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली असून, संवेदनशील असलेल्या 100 पेक्षा जास्त ठिकाणी गुन्हे शाखेचे विशेष लक्ष असणार आहे.

PMC Election 2026: लाडक्या बहिणींना चांदीच्या जोडव्यांचे प्रलोभन, भावांसाठी आणलेली 1 कोटींची दारू जप्त
पुणे:

Pune Municipal Corporation Election 2026: पुणे महानगरपालिका निवडणुकीची (Pune Election 2026) प्रक्रिया मुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी पुणे शहर पोलीस (Pune Police Bandobast) आयुक्तालयाने कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आलेल्या या आराखड्यानुसार, शहरात तब्बल 12,500 पोलीस कर्मचाऱ्यांसह निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत. निवडणूक आचारसंहितेचा भंग रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आयुक्तालयाने आतापर्यंत 3,439 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

पुण्यात 100हून अधिक संवेदनशील ठिकाणे

​पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण शहराची 143 सेक्टरमध्ये विभागणी करण्यात आली असून, संवेदनशील असलेल्या 100 पेक्षा जास्त ठिकाणी गुन्हे शाखेचे विशेष लक्ष असणार आहे. या बंदोबस्तामध्ये 14 पोलीस उप आयुक्त, 30 सहाय्यक पोलीस आयुक्त आणि 166 पोलीस निरीक्षकांचा समावेश असून त्यांना एसआरपीएफच्या 4 कंपन्यांची जोड मिळणार आहे. केवळ मनुष्यबळच नव्हे, तर तांत्रिक देखरेखीसाठी 18 स्थिर, 15 फिरते आणि 15 व्हिडिओ सर्वेलन्स पथके कार्यरत आहेत.

1 कोटींहून अधिक किंमतीची दारू जप्त

​आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 67 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, 1 कोटी 23 लाख रुपयांचे अवैध मद्य आणि 26 लाख रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या काळात शस्त्र परवाना असलेल्या 3,294 व्यक्तींची शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. पुण्यातील महिला मतदारांना प्रलोभन देण्यासाठी चांदीची जोडवी वाटण्यात आली असल्याचाही प्रकार घडला आहे. याशिवाय मतदारांना पैसे वाटण्याच्याही घटना घडल्या असून, या दोन्ही प्रकारांत मिळून पोलिसांनी 2 लाखांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com