
रेवती हिंगवे, पुणे
Pune Rain News : पुण्यात आज सकाळपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे रस्त्यावर हळूहळू पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील घाट माथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आला आहे.
(नक्की वाचा- Mumbai Local Train Update: पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत! तिन्ही मार्गावरील लोकल उशिरा, वाचा सविस्तर)
सध्या विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग
- कासारसाई - 560 क्युसेक्स
- वरसगाव धरण - 3909 क्युसेक्स
- खडकवासला धरण- 4170 क्युसेक्स
- भाटघर धरण - 12,114 क्युसेक्स
- पानशेत - 3996 क्युसेक्स
- पवना - 2860 क्युसेक्स
शहरातील नागरिकांना पावसाळ्यात योग्य ती खबरदारी घेण्याचे आणि नदीकाठच्या परिसरातील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.