काँग्रेस व महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुकीत पूर्ण तयारीने उतरली असून काँग्रेस आज 6 नोव्हेंबर रोजी प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असून नागपुरात दुपारी 1 वाजता ‘संविधान सन्मान संमेलनाला' उपस्थित राहणार आहेत. तर संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुलातील MMRDA मैदानात मविआची ‘महाराष्ट्र स्वाभिमान सभा' होणार असून या सभेत विधानसभा निवडणुकासाठी काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी जाहीर करणार आहेत.
राहुल गांधी यांनी नागपूरमधून प्रचाराला सुरुवात करण्याचे देखील महत्त्व आहे. नागपूर हे विदर्भाचं केंद्र आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत असलेल्या 76 मतदारसंघांपैकी 36 मतदारसंघ विदर्भातील आहेत. हा राज्याचा कापूस पट्टा देखील आहे. राज्यातील सर्व विभागांमध्ये भाजप विदर्भात सर्वाधिक 47 जागा सर्वाधिक जागा लढत आहे.
विदर्भ हा काँग्रेसचा पारंपारिक बालेकिल्ला होता, पण भाजपने 62 पैकी 44 विधानसभा मतदारसंघ जिंकल्यामुळे पक्षाची त्यावरची पकड सुटली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीने, ज्यामध्ये त्यांनी विदर्भातील 10 पैकी चार लोकसभा जागांवर विजय मिळवला, त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही विदर्भातून काँग्रेसला बऱ्याच आशा आहे.
काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या यशाचे प्रमुख कारण म्हणजे संविधान, आरक्षण आणि जातिगणना या मुद्द्यांवर दिलेला भर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेसचे दोन प्रमुख नेते विदर्भातील आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त पक्षाकडे दुसऱ्या क्रमांकाचे अनेक शक्तिशाली नेते येथून आहेत.
बुधवारी संध्याकाळी राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उद्धव ठाकरे आणि शरद पवार मुंबईत "स्वाभिमान सभेला" संबोधित करतील. महाविकास आघाडी यावेळी हमीपत्र जाहीर करु शकते. शेतकरी कर्जमाफी आणि जातीयगणना या प्रमुख हमी यात असण्याची शक्यता आहे. युती एकनाथ शिंदे सरकारच्या माझी लाडकी बहीcण योजनेला विरोध करण्यासाठी एखादी योजना देखील जाहीर करू शकते. ज्या अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जातील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world