मुंबईत झालेल्या पावसाने नागरिकांचे (Mumbai Red Alert) अक्षरश: हाल झाले. अवघ्या काही तासांच्या पावसाने मुंबईचे वेळापत्रकच कोलमडून गेलं. ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांना तीन ते चार तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यात सायंकाळनंतर मध्य आणि हार्बर रेल्वे लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे चाकरमान्यांच्या परतीचा मार्गही बंद झाला. त्यामुळे कामावरून परतताना चाकरमान्यांचे अतोनात हाल झाले. (Rain Update)
नक्की वाचा - पावसाचे डोके फिरले, मुंबईकर लटकले; प्रमुख रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी
दरम्यान आजही मुंबईत पावसाचा रेड अलर्ट असल्याने प्रशासनाकडून शाळा, कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं नागरीकांना आवाहन करण्यात आलं आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरीलाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ठाण्यातील शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
🛑In next 2 days heavy rain expected over north Bihar, Nepal, northeast UP, north Bengal, south Gujarat and parts of west Maharashtra including Mumbai. Please remain vigilant and avoid unnecessary travelling over these regions. Follow IMD Alerts.
— All India Weather (AIW) (@pkusrain) September 26, 2024
Image: windy pic.twitter.com/Nhl1uJ0N8p
मुंबईत अवघ्या पाच तासात 200 मि.मी. पावसाची नोंद झाली असून पवईत 234 मी.मी. पाऊस तर मानखुर्दमध्ये 276 मी.मी. पावसाची नोंद करण्यात आली. यादरम्यान विविध घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत पडलेल्या पावसानं प्रशासनाचे दावे फोल ठरले आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर अनेक तास एकाच ठिकाणी अडकून पडले होते.
नक्की वाचा - Mumbai Rain : परतीच्या पावसानं मुंबईकरांची दाणादाण, घरी जाताना हाल, शाळांना सुट्टी जाहीर
मुंबईला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. तरी मुंबईत पहाटेपासुन पावसाची विश्रांती आहे. समुद्राला उधाण असल्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर न जाणाचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं ( हाय टाईड वेळ सकाळी -७ वा १ मि ) आहे. त्याशिवाय सध्यस्थितीला सर्व रेल्वे आणि रस्ते वाहतूक सुरळीत असल्याची माहिती आहे. (Train Update)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world