कुलगुरू डॉ. अजित रानडे यांनी उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पुण्याच्या गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या विरोधात डॉ. रानडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर कोर्टाने पुढील सुनावणी 23 सप्टेबरला ठेवली आहे. शिवाय रानडे यांना दिलासा देताना सुनावणी होत नाही तोपर्यंत रानडेंना पदावरून हटवू नये असे आदेशही दिले आहेत. त्यामुळे रानडे यांना दिलासा मिळाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रानडे यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर रानडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 14 सप्टेंबरला डॉ रानडे यांना गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदावरुन हटवण्याचा घेण्यात आला होता. त्यानंतर कुलपतींकडे कुलगुरू रानडे यांनी 21 सप्टेंबरपर्यंत पदावर कार्यरत राहण्यासाठी विनंती केली. ही विनंती मान्यही करण्यात आली. असा दावा रानडे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. शिवाय याच काळात डॉ. रानडे हे उच्च न्यायालयात गेले.
ट्रेंडिंग बातमी - नाव "प्रेम" पण इंस्टावरच्या भयंकर चाळ्यांमुळे 'असा' झाला गेम
दरम्यान या प्रकरणाची सुनावणी नियमित खंडपीठ नसल्याने ती आता 23 सप्टेबरला होणार आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत रानडे यांना पदावरून हटवू नये. त्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये अशी मागणी रानडे यांच्या वकिलांनी कोर्टात केली. शिवाय नियमित खंडपीठासमोर आम्हाला आमची बाजू मांडायची आहे. त्यासाठी वेळ मिळेल असंही ते म्हणाले. त्यावर रानडे यांची ही मागणी न्यायालयाने मान्य केली. जर याबाबत प्रतिवादीला काही उत्तर सादर करायचे असल्यास त्यांनी ते 21 पर्यंत करावे असे निर्देशही देण्यात आले आहेत.
डॉ. अजित रानडे यांची कुलगुरुपदी करण्यात आलेली नियुक्ती ही वादात सापडली आहे. त्यांची निवड विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करत असल्याचे समोर आले. शोध समितीने ही याबाबत हिच भूमिका मांडली आहे. त्यानंतर विद्यापीठाचे कुलपती बिबेक देबरॉय यांनी रानडे यांची कुलगुरुपदी करण्यात आलेली नियुक्ती रद्द केली. त्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक त्यांनी जाहीर केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world