जाहिरात
This Article is From Aug 19, 2024

Shivsena vs BJP : चमकोगिरी करणाऱ्या रविंद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या, रामदास कदम आक्रमक

Shivsena vs BJP : चमकोगिरी करणाऱ्या रविंद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या, रामदास कदम आक्रमक

मुंबई-गोवा महामार्गावरुन शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. मुंबई-गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही याचं दु:ख वाटतंय. नुसते पाहणी दौरे कशाला करायचे. त्यापेक्षा चमकोगिरी करणाऱ्या बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचा देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रामदास कदम यांनी म्हटलं की, केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा शायनिंग मारण्यापेक्षा मुंबई-गोवा महामार्गाचं खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे. अनेक पूल झालेले नाहीत. एका बाजूने रस्ता आहे, तो पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. अशी अवस्था असताना नुसता पाहणी दौरा कशासाठी? खरंतर आमच्या देवेंद्र फडणवीसांनी रविंद्र चव्हाणांचा राजीनामा घेतला पाहिजे.

(नक्की वाचा-  नंदुरबारमध्ये भाजपचं टेन्शन वाढलं; विद्यमान आमदार काँग्रेसच्या वाटेवर?)

मी थेट सांगतो ते कुचकामी मंत्री आहेत. कोकणवासियांचे हाल आम्हाला बघवत नाही. कोकणातील माणसे आम्हाला जाब विचारतात. आम्ही किती सहन करणार. महायुतीत असताना देखील मला बोलावं लागतंय, मात्र माझा नाईलाज आहे, असं रामदास कदम म्हणाले. 

( नक्की वाचा : 'MVA सरकारचा मला अटक करण्याचा प्लॅन होता' CM एकनाथ शिंदेंचा खळबळजनक आरोप )

प्रभू श्रीरामाचा वनवास 14 वर्षांनी संपला. मात्र मुंबई - गोवा मार्गाचा आमचा वनवास मात्र संपत नाही. त्याचं दु:ख माझ्या मनात आहे. माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं आहे. एक शिष्टमंडळ घेऊन मी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देखील भेटणार आहे. त्यांनी स्वत: लक्ष घालावं अशी मी मागणी करणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी केवळ आश्वासन दिले. गणपतीच्या तोंडांवर देखील रस्त्याची अवस्था खूप खराब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: लक्ष घालणार असल्याचं म्हटलं आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: