
संकेत कुलकर्णी
Massive Police Raid in Sangola: सांगोला तालुक्यातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ₹2.65 कोटी रुपयांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून खळबळ उडवून दिली आहे. ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, यात तब्बल 30 ते 35 जुगारींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. पोलिसांनी ₹16 लाख रुपयांची रोकड, 87 वाहने आणि 62 मोबाईल जप्त केले आहेत.
नक्की वाचा: गुगलच्या टीमला गावकऱ्यांनी धू धू धुतलं; पोलिसांच्या मध्यस्थीने मोठा अनर्थ टळला
मटण भाकरी हॉटेलमध्ये जुगाराचा अड्डा?
सांगोला तालुक्यातील सोनंद येथील 'हॉटेल मटन भाकरी'मध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सांगोला पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. पोलीस आल्याचे समजताच जुगार खेळणाऱ्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या कडव्या बंदोबस्तामुळे त्यांची पळापळ निष्फळ ठरली. पोलिसांच्या या अचानक धडकेने जुगार अड्ड्यावर एकच गोंधळ उडाला.
नक्की वाचा: इन्स्टाग्रामवर मैत्री, अल्पवयीन मुलीने तरुणाला घरी बोलावलं, नराधमाने नको ते केलं
16 लाखांची रोख रक्कम जप्त
या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ₹16 लाख रुपयांची रोख रक्कम, जुगार खेळण्यासाठी आलेल्या 24 चारचाकी आणि 61 दुचाकींसह एकूण 87 वाहने आणि 62 मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ₹2.65 कोटी रुपये आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी ही कारवाई यशस्वी केली. या मोठ्या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world