जाहिरात

Ulhasnagar News : विद्यार्थ्यांना वाचता आलं नाही, उल्हासनगर महापालिका आयुक्तांची शिक्षिकेला नोटीस

Ulhasnagar News : उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अचानक महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा करत झाडाझडती घेतली.

Ulhasnagar News : विद्यार्थ्यांना वाचता आलं नाही, उल्हासनगर महापालिका आयुक्तांची शिक्षिकेला नोटीस

निनाद करमरकर, उल्हासनगर

Ulhasnagar News : विद्यार्थ्यांना वाचता आलं नाही म्हणून उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी थेट शिक्षिकेला नोटीस धाडली आहे. उल्हासनगरात आयुक्तांकडून महापालिका शाळांची झाडाझडती घेण्यात आली. शाळांची गुणवत्ता आणि दर्जा सुधारण्याची तंबी देखील महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अचानक महापालिकेच्या शाळांचा पाहणी दौरा करत झाडाझडती घेतली. यावेळी काही विद्यार्थ्यांना वाचताही न आल्यानं त्यांच्या शिक्षिकेला आयुक्तांनी थेट नोटीस बजावत सुधारणा न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला.

(नक्की वाचा- रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर व्यवहार ठप्प, ठेवीदारांची बँकेबाहेर गर्दी; तुमचंही या बँकेत खातं आहे का?)

उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक 8, 23 आणि 29 यांना आयुक्त मनिषा आव्हाळे भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची तपासणी त्यांनी केली. यात शाळा क्रमांक 8 मध्ये विद्यार्थ्यांना साधी पाठ्यपुस्तकं सुद्धा वाचता येत नसल्याचं निदर्शनास येताच आयुक्तांचा पारा चढला आणि त्यांनी थेट तिथल्या संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली. 

(नक्की वाचा- संतापजनक! वाळू माफियांकडून महसूल पथकाला पेटवून देण्याचा प्रयत्न; थोडक्यात वाचला जीव)

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा न झाल्यास शिक्षकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी महापालिका आयुक्तांनी दिला. आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या या करवाईमुळे पालिकेच्या शाळांमध्ये केवळ पाट्या टाकणाऱ्या शिक्षकांचे धाबे मात्र दणाणले आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: