विधानसभेतील 70 जागांवर शरद पवार गटाचं सर्व्हेक्षण; कशी ठरवणार निवडणुकीची रणनीती?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 70 जागांवर सर्व्हे केल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या टप्प्यात शरद पवार गट 30 जागांचा सर्व्हे करणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला (MVA) मिळालेल्या यशामुळे महायुतीला जबर धक्का बसला होता. दलित-मुस्लीम-महिला आणि शेतकऱ्यांची एकगठ्ठा मतं मविआला मिळाल्यामुळे लोकसभेत पक्षफुटीनंतर त्यांना मोठं यश मिळवता आलं होतं. दरम्यान आता सर्वांचं लक्ष विधानसभेकडे आहे. यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एक (NCP Sharad Pawar) सर्व्हे करण्यात आला. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही जनतेचा कल कायम राहण्याची शक्यता आहे. प्राथमिक पातळीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 70 जागांवर सर्व्हे केला आहे. यावरून ते किमात 70 जागा लढवतील हे तर निश्चित मानलं जात आहे. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने पहिल्या टप्प्यात विधानसभेच्या 70 जागांवर सर्व्हे केल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या टप्प्यात शरद पवार गट 30 जागांचा सर्व्हे करणार आहे. लोकसभेत यश मिळालेल्या मतदारसंघात शरद पवारांची लाट कायम असल्याचं दिसतंय. मराठा - मुस्लीम आणि दलित मतदारांच्या भरोशावर अधिक जागा मिळण्याचे संकेत या सर्व्हेतून दिसतायेत.   

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भात जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती सर्व्हेतून समोर आली आहे.  आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे बंडखोर आमदारांना पक्षात घेण्याऐवजी शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता अधिक असल्याचं दिसतंय. बंडखोरी केलेल्या नेत्यांबद्दल जनतेत अद्यापही रोष कायम आहे. त्यामुळे या विधानसभेत नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल असं दिसतंय.  

नक्की वाचा - शिवस्वराज्य यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना टळली, जयंत पाटील, कोल्हे थोडक्यात बचावले; Video मध्ये पाहा नेमकं काय घडलं

सर्व्हेतील काही प्रमुख निरीक्षणे  :  

- पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा सर्वाधिक चांगले वातावरण 

- राष्ट्रवादीत बंडखोरी झालेल्या अजित पवार गटात नवीन चेहऱ्यांना पसंती मिळत असल्याचं दिसतंय..

- तरुण आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी सर्व्हेतील लोकांचं मत आहे.

- राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनांचा जनतेत परिणाम दिसत असला तरी या योजना निवडणुकीपुरत्या सीमित राहतील यावरून संभ्रम असल्याचं दिसतंय..

- विदर्भ, मराठवाडा आणि ग्रामीण भागात महाविकास आघाडीचा प्रभाव असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला त्याचा फायदा होऊ शकतो. 

- लोकसभेत मविआची जादू पाहायला मिळाली होती, तिच विधानसभेतही असल्याचं सर्व्हेतून समोर येतंय. 

- मेट्रो शहरांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याचं दिसतंय. मात्र या मतदारसंघात ठाकरे गटासाठी जमेची बाजू असून परिणामी मविआला याचा फायदा होऊ शकतो.