Thane Metro trial Live Updates: ठाणे शहर विस्तारत असताना वाहतूक कोंडीचं जाळंही पसरत चाललं आहे. काही मिनिटाच्या प्रवासासाठी नागरिकांना तासन् तास प्रवास करावा लागत आहे. अखेर ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. आज ठाण्यात गायमुख ते पूर्व द्रुतगती मार्गावरील कॅडबरी जंक्शन या मार्गावरील पहिली मेट्रो धावणार आहे. याचं ट्रायल रन आज सोमवार, 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मेट्रो ट्रायल रनला हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे. ठाणेकरांमध्येही याचा उत्साह पाहायला मिळत आहे.
सध्या ठाणे मेट्रो प्रकल्प ४ (वडाळा-घाटकोपर) आणि ४ - अ (कासारवडवली ते गायमुख) या प्रकल्पाची कामं सुरू आहेत. आज होणारी चाचणी घोडबंदर येथील गायमुख ते पूर्व द्रुतगती मार्गावरील कॅडबरी जंक्शनपर्यंत (13 किमी )होणार आहे. घोडबंदर येथील गायमुख येथून आज सकाळी १०.३० वाजता मेट्रो ट्रेनची चाचणी होणार आहे. ही चाचणी वर दिलेल्या दहा स्थानकातून होईल.
Thane Metro Trial LIVE Update: ठाणे मेट्रोची चाचणी! CM फडणवीस काय म्हणाले?
* आज मेट्रो ४ अ महत्वाच्या पहिल्या टप्प्याचे टेस्टिंग आम्ही करत आहोत
* ठाणेकरांसाठी हा मार्ग महत्वपूर्ण असणार आहे
* ३५ किमी ची एकूण लांबी असणार आहे
* मेट्रो चार ची लांबी ३२ किमी आणि ४ अ ची २.८१ अशी ३५ किमी लांबी आहे
* एकूण ३२ स्थानक यात आहेत
* जवळपास १६ हजार कोटी खर्च करण्यात येत आहेत
* दैनंदिन प्रवासी संख्या १३ लाख ४७ हजार अपेक्षित असणार आहे पूर्ण मार्ग सुरू झाल्यावर
* मोघरपाडा येथे डेपो करिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे ४५ हेक्टर जागा त्याठिकाणी उपलब्ध झाली असल्या मुळे मेट्रो ४ मेट्रो ४ अ मेट्रो १० आणि ११ डेपो म्हणून काम होणार आहे
* या मार्गिकवरील मेट्रो आठ डब्यांची असणार आहे
* पूर्व उपनगरे पश्चिम उपनगरे मुंबई आणि ठाणे असे जोडणारा मार्ग असणार आहे
* मेट्रो ११ वडाळा ते सीएसएमटी पर्यंत जातो यालाही जोडला जाणार आहे हा सगळ्यात लांब मार्ग असणार आहे ५५ किमी च हा मार्ग होईल यातून २१ लाख लोक रोज प्रवास करतील
* प्रवासच वेळ पन्नास ते ७५ टक्के कमी होणार आहे
* विशेषतः रस्त्यावरची वाहतूक नियमित होणार आहे
* टप्प्या टप्प्याने पुढच्या वर्षी पर्यंत सर्व टप्पे पूर्ण झाले पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे
* मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष अभिनंदन करतो ha टप्पा होण्याकरिता त्यांनी विशेष प्रयत्न केले
* मोघर पड्याला डेपोची आवश्यकता होती त्यासाठी प्रयत्न करून अनेक अडचणी त्या ठिकाणी होत्या त्या दूर करून ती जमीन डेपो करिता मिळवून दिली
* आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील डेपो साठी विशेष प्रयत्न केले आहे
* मी ठाणेकर आणि मुंबईकर यांना विश्वास देऊ इच्छितो पुढच्या वर्षी पर्यंत यातला मॅक्सीमम काम आम्ही पूर्ण करू पण काही काम २०२७ पर्यंत जाईल
* एकदा हा मार्ग झाला ठाण्या पासून CSMT पर्यंत मार्गिका ही मुंबई आणि ठाणे करांकरिता उपलब्ध होणार आहे
Thane Metro Trial LIVE Update: आजचा दिवस ठाणेकरांसाठी ऐतिहासिक: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आजचा दिवस ठाणेकरांसाठी आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. अनंत अडचणीतून हा मार्ग पूर्ण होत आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी इतर मेट्रोला मान्यता देऊन ठाण्याला वगळले होते. या मेट्रोसाठी आम्हाला आंदोलन करावे लागले. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर या मेट्रोला चालना मिळाली. दुर्दैवाने २०१९ नंतर महाविकास आघाडीच्या काळात या सर्व प्रकल्पांना स्थगिती मिळाली.
LIVE Update: ठाणे मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची हजेरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे मेट्रोचे उद्घाटन|
Thane Metro Trial LIVE Update: ठाणे मेट्रोची पहिली झलक
Thane Metro Trial Live Update: कशी असेल ठाण्याची मेट्रो?
कशी असेल ठाण्याची मेट्रो? Thane Metro Stations
ठाणे मेट्रो 4 ही ३२ किलोमीटर तर ४ अ ही २.७ किलोमीटर मार्गावर धावेल. दोन्ही मार्गिका मिळून ३२ स्टेशन असतील. यामध्ये
1) कॅडबरी
2) माजीवाडा
3) कपूरबावाडी
4) मानपाडा
5) टिकूजी -नी -वाडी
6) डोंगरी पाडा
7) विजय गार्डन
8) कासरवाडावली,
9) गोवानिवाडा
10) गायमुख
या स्थानकांचा समावेश आहे.
Thane Metro Trial Live Update: ठाणे मेट्रोची आज चाचणी, ठाणेकरांची वाहतूककोडींतून सुटका होणार
बहुप्रतिक्षित ठाणे मेट्रोची आज चाचणी
A new lifestyle, a new lifeline for Thane...the wait is getting shorter...
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) September 21, 2025
ठाण्यासाठी नवी जीवनशैली, नवी जीवनवाहिनी...
प्रतीक्षा कमी होत आहे...#MahaMumbaiMetro #MumbaiInMinutes #MMRDA50 #RebootingMumbai #ReshapingMMR #EfficientConnectivity@Dev_Fadnavis @mieknathshinde… pic.twitter.com/x6JAPjoULB