जाहिरात

Political News : उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज; 26 डिसेंबरपासून बैठकांचा धडाका

Uddhav Thackeray Meeting: 26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठका घेणार आहेत. विधानसभा निहाय या बैठका होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत.

Political News : उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सज्ज; 26 डिसेंबरपासून बैठकांचा धडाका

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर आता ठाकरे गटाने कंबर कसली आहे. आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी तयारी सुरु केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी 26 तारखेपासून ठाकरे गटाच्या मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित या बैठका होणार आहे. 

26 डिसेंबर, 27,28 आणि 29 डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठका घेणार आहेत. विधानसभा निहाय या बैठका होणार असून स्वतः उद्धव ठाकरे बैठकीच्या माध्यमातून आढावा घेणार आहेत. 21 डिसेंबर रोजी मुंबईतील निरीक्षकांची बैठक पार पडली होती, त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुंबईत विधानसभानिहाय निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी वार्डनिहाय शाखाप्रमुख ते विभागप्रमुखांशी बातचीत केली होती. त्यानंतर या निरीक्षकांनी अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे 21 तारखेच्या बैठकीत सादर केला होता. आगामी मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी, असं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यासाठी उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बातचीत करणार आहेत.  

या बैठकीसाठी विभागप्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश मातोश्रीवरुन देण्यात आले आहेत. या बैठकीत महानगरपालिकेच्या तयारीचा आढावा तसेच जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या शाखा भेटीचे आयोजन करण्यासंदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे.

कधी आणि कुठे होतील बैठका

  • 26 डिसेंबर - बोरिवली विधानसभा , दहिसर विधानसभा , मागाठाणे विधानसभा, दिंडोशी, चारकोप, कांदिवली आणि मालाड विधानसभा 
  • 27 डिसेंबर -अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, चांदिवली, कुर्ला, कलिना विधानसभा 
  • 28 डिसेंबर -मुलुंड, विक्रोळी, भांडुप, मानखुर्द - शिवाजीनगर, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, अनुशक्तीनगर, चेंबूर, सायन कोळीवाडा 
  • 29 डिसेंबर - धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुबादेवी, कुलाबा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com