रिलॅक्सेशनसाठी घरी बोलावलेला मसाज एका महिलेसाठी वेदना आणि मानसिक धक्क्याचे कारण ठरला आहे. मुंबईतील वडाळा येथे आपल्या मुलासोबत राहणाऱ्या एका 46 वर्षीय महिलेने 'फ्रोजन शोल्डर'च्या त्रासामुळे अर्बन कंपनी ॲपवरून मसाज सर्व्हिस बुक केली होती. मात्र, थेरपिस्ट घरी आल्यावर उद्भवलेल्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली.
महिला ग्राहकाने अर्बन कंपनीच्या महिला थेरपिस्टवर मारहाण, केस खेचणे आणि चेहऱ्यावर मारल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वादाची ठिणगी कशी पडली?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित थेरपिस्ट आपल्यासोबत एक मोठा 'मसाज बेड' घेऊन आली होती. घराच्या सेटअपमध्ये इतका मोठा बेड आणि थेरपिस्टचे वागणे पाहून महिला ग्राहकाला असुरक्षित वाटू लागले. त्यांनी मसाज न घेण्याचे ठरवून सर्व्हिस कॅन्सल केली आणि रिफंडसाठी ॲपवर प्रक्रिया सुरू केली.
(नक्की वाचा- Rain Alert: महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट! 26 जानेवारीपर्यंत 7 जिल्ह्यांत पावसाचा इशारा; शेतकरी चिंतेत)
VIDEO
मारहाण आणि शिवीगाळ
बुकिंग रद्द झाल्याचे समजताच थेरपिस्टने आपला संयम गमावला आणि महिला ग्राहकाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या आरोपानुसार, थेरपिस्टने महिलेचे केस खेचले आणि त्यांच्या चेहऱ्यावर जोरात मारले. आईचा बचाव करण्यासाठी आलेल्या मुलालाही थेरपिस्टने धक्काबुक्की केली.
(नक्की वाचा- Badlapur News: बदलापुरात शिवसेनेच्या नगरसेवकाला भररस्त्यात बेदम मारहाण; भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल)
पोलिसांची कारवाई आणि ॲपमधील तांत्रिक घोळ
घटनेनंतर पीडितेने 100 नंबरवर कॉल करून पोलिसांना कळवले, पण पोलीस येण्यापूर्वीच आरोपी महिला तिथून पसार झाली होती. वडाळा पोलिसांनी याप्रकरणी तक्रार NC नोंदवून घेतली आहे. पोलीस तपासात असे आढळले की, ॲपवर थेरपिस्टची ओळख आणि नावाबद्दल काही तांत्रिक त्रुटी होत्या, ज्या नंतर अपडेट करण्यात आल्या. पोलीस आता व्हायरल व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world