सूरज कसबे, पिंपरी चिंचवड
HAIDROPONIX FARMING : वाढती लोकसंख्या, जमिनीची कमतरता आणि घटती भूजल पातळी या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी 'हायमीडिया' समूहाची 'हायग्रोनिक्स' ही शाखा सरसावली आहे. 2016 पासून कार्यरत असलेल्या या उपक्रमाने आधुनिक 'हायड्रोपोनिक्स' (मातीशिवाय शेती) तंत्रज्ञान आता सर्वसामान्य शेतकरी आणि शहरी नागरिकांच्या आवाक्यात आणले आहे.
काय आहे हायड्रोपोनिक्स?
हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीचा वापर न करता, केवळ पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या पाण्यात झाडे वाढवण्याचे तंत्र. हायग्रोनिक्सचे संस्थापक डॉ. विशाल जी. वारके यांच्या मते, "पारंपरिक शेतीच्या तुलनेत या पद्धतीत केवळ 7% पाणी लागते. यामुळे पाण्याची मोठी बचत होऊन नियंत्रित वातावरणात अधिक उत्पादन घेणे शक्य होते.

(नक्की वाचा- Buldhana News: डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू)
पालेभाज्यांसाठी 'Green Leafy GL-L', फळभाज्यांसाठी यात शिमला मिरची, चेरी टोमॅटो , मोठे टोमॅटो तर 'TV-PLUS' आणि स्ट्रॉबेरीसाठी खास पोषक घटक विकसित केले आहेत. मातीला पर्याय म्हणून नारळाच्या भुशापासून बनवलेले 'CocoBlok' आणि 'FastPlug' यांसारखे 100% नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहेत.
व्यावसायिक शेतीसाठी फूड-ग्रेड मटेरियलपासून बनवलेले NFT चॅनल्स, डच बकेट आणि उभ्या लागवडीसाठी 'वर्टीस्टॅक' ही साधने पिकांच्या वाढीला गती देतात.
(नक्की वाचा- Akola News: अकोला महापालिका निवडणुकीत भाजपची कोंडी; बंडखोरांची नवी आघाडी पक्षासाठी ठरणार डोकेदुखी)
ऑटोमेशन आणि पाणी तपासणी
हायड्रोपोनिक्समध्ये अचूकता महत्त्वाची असते. यासाठी 'Intellidose' सारख्या ऑटोमेशन सिस्टीमद्वारे पोषक तत्वांचे नियोजन घरबसल्या इंटरनेटच्या मदतीने करता येते. तसेच, शेती सुरू करण्यापूर्वी पाण्याचा दर्जा तपासण्यासाठी हायग्रोनिक्सची अद्ययावत प्रयोगशाळा भौतिक, रासायनिक आणि सूक्ष्मजीवशास्त्रीय तपासणी सेवा पुरवते. केवळ व्यवसाय न करता, हायड्रोपोनिक्सचे शिक्षण देऊन समाजात बदल घडवणे हे हायग्रोनिक्सचे मुख्य ध्येय आहे. भविष्यातील अन्नाची गरज भागवण्यासाठी हे तंत्रज्ञान शाश्वत पर्याय ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world