जाहिरात

Vidhan Sabha Election 2024 : कल्याण ग्रामीण जागेसाठी भाजपची आक्रमक भूमिका, शिवसेनेचा सावध पवित्रा

कल्याण ग्रा्मीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे आमदार राजू पाटील आहेत. 2009 साली राजू पाटील यांचे मोठे बंधू रमेश पाटील हे मनसेकडून निवडून आले. 2014 साली शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले होते.

Vidhan Sabha Election 2024 : कल्याण ग्रामीण जागेसाठी भाजपची आक्रमक भूमिका, शिवसेनेचा सावध पवित्रा

अमजद खान, कल्याण

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. एकीकडे हे सुरु असताना कल्याण ग्रामीण विधानसभा जागा भाजपकरता सोडण्यात यावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्षच आपला शत्रू आहे. कमळ असेल तरच आम्ही काम करु, अशी भूमिका घेतली आहे. मात्र भाजपच्या या भूमिकेवर शिवसेनेकडून सावध पावित्रा घेण्यात आला आहे. जागावाटप हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. आम्ही युतीचा धर्म पाळणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याण ग्रा्मीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे आमदार राजू पाटील आहेत. 2009 साली राजू पाटील यांचे मोठे बंधू रमेश पाटील हे मनसेकडून निवडून आले. 2014 साली शिवसेनेचे सुभाष भोईर निवडून आले होते. यंदा या जागेकरीता महायुतीत रस्सीखेच सुरु झाली आहे. रविवारी संघ्याकाळी भाजपच्या कल्याण ग्रामीणमधील कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. 

(नक्की वाचा - Mumbai Toll Tax Free : मुंबई टोलमुक्त, कोणत्या वाहनांना सूट मिळणार? प्रवाशांची किती बचत होणार?)

या मेळाव्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचा एकच सूर होता. ही जागा भाजपने लढवावी. यावेळी ज्या पदाधिकाऱ्यांनी भाषणे केली, त्यात ही जागा कोणत्याही परिस्थिती भाजपला मिळाली पाहिजे. याबाबत भाजप पदाधिकारी शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, महायुतीत असे ठरले आहे की सध्या जी जागा ज्याच्याकडे आहे त्याच पक्षाला सोडण्यात येईल. मात्र कल्याण ग्रामीण विधानसभेत आमदार मनसेचा आहे. 

( नक्की वाचा : सुपरफास्ट महायुती सरकार ! 1 तास 48 मिनिटांच्या बैठकीत झाले 80 निर्णय, कुणाचा होणार फायदा? )

2014 साली भाजपचा उमेदवार नसल्याने 10 हजार मतदारांनी नोटाला मतदान केले. ज्याठिकाणी कमळ नव्हते त्याठिकाणी नोटा चालला. यंदा ही जागा भाजपला सोडण्यात यावी अशी मागणी भाजपने केली. मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामाध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही मागणी केली जाणार आहे. या बैठकीत जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, पदाधिकारी शशिकांत कांबळे, मंडल अध्यक्ष नंदू परब, महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी आदी उपस्थित होते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
उद्धव ठाकरेंवर झाली अँजिओप्लास्टी, हृदयात होते ब्लॉकेज, हॉस्पिटलमध्ये दाखल!
Vidhan Sabha Election 2024 : कल्याण ग्रामीण जागेसाठी भाजपची आक्रमक भूमिका, शिवसेनेचा सावध पवित्रा
baba-siddique-murder-case-pune-connection-revealed-latest-update
Next Article
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं पुणे कनेक्शन उघड, बिश्नोई टोळीचं बनलंय राज्यातील ठाणं?