विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावधीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहे. बैठकांचा सिलसिला देखील सुरू आहे. मात्र महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचंही जागावाटपाची चर्चा पूर्णत्वाला गेलेली नाही.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीची जागावाटपाची चर्चा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न तिन्ही पक्षांचा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महायुतीतील जागावाटपच्या चर्चे काही जागांवर तिन्ही पक्षामध्ये मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा वरिष्ठ पातळीवर दिल्लीत अमित शाह यांच्याकडे सोडवला जाणार असल्याचंही खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे.
(नक्की वाचा - - 'राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची गरज नाही' आता केंद्रीय मंत्री थेट बोलले)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जागावाटपाबाबत स्वतंत्र दोन बैठका झाल्या आहेत. तिन्ही पक्षांचं ज्या जागांवर एकमत आहे, अशा जागांबाबत चर्चा झाली आहे. मात्र, ज्या जागांवर तीनही पक्ष आग्रही आहेत अशा जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
महायुतीतील तीनही पक्ष ज्या जागांवर आग्रही आहे त्या जागांचा तिढा अमित शाह यांच्याकडे सोडवला जाणार आहे. लोकसभेच्यावेळी तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांबाबत अमित शाह यांनी बैठक घेऊन तिढा सोडवला होता.
(नक्की वाचा- - "राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य)
कुणाच्या वाट्याला किती जागा?
भाजप जवळपास 150 जागा लढणार असल्याचे समजत आहे. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जवळपास 70 जागांची मागणी केली जात असल्याचं कळतंय. शिवसेना शिंदे गटाचीही जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे कुणाच्या वाट्याला किती जागा येणार याची उत्सुकता वाढली आहे.