
रेवती हिंगवे
पुण्याच्या येवलेवाडीत मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत चार कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. माल उतरवताना ही दुर्घटना झाली आहे. लाकडी पेटी ज्यात काचा लोडिंग अनलोडींग करतात. त्याच वेळी या लाकडी पेटी कामगारांच्या अंगावर पडल्या. या एका पेटीचे वजन तब्बल एक ते दोन टन असते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या पेट्या काढत असतानाही दुर्घटना घडली आहे. या पेट्या पडल्या त्या खाली काही कामगार आले.या पेट्यांच्या वजनामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सहा जण हे गंभीर जखमी आहेत. त्यांना तातडीने ससून रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंच्याच गडात सेना-भाजप वाद पेटला, थेट खंजीर खूपसण्याची भाषा
पुण्यात रविवारी दुपारी दिडच्या सुमारास येवलेवाडी परिसरात असलेल्या एका काचेच्या कारखान्यात माल उतरवण्याचे काम सुरू होते. त्याच वेळी माल अंगावर पडल्याने एकूण सहा कामगार गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 4 जणांचा मृत्यू झाला. काचेचा माल हा एका लाडकी पेटीतून लोड आणि अनलोड केला जातो.
त्या पेट्या एका पट्ट्याने ट्रकमध्ये बांधलेल्या असतात. कारण त्या पेट्यांचं वजन एक ते दोन टन इतकं असत. येवलेवाडीतल्या कारखान्यात जेव्हा साहित्य उतरवलं जातं होतं, तेव्हा हा पट्टा तुटल्याने ते एक ते दोन टनाच्या पेट्या त्या कामगारांवर पडल्या. त्यातच सहा जण गंभीर जखमी झाले. पुणे अग्निशमन दलाने त्वरित त्यांना बाहेर काढून ससून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण अजूनही गंभीर जखमी आहेत. त्यांचावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world