पावसाळ्यात वर्षा पर्यटनाचा मोह कोणालाच आवरत नाही. त्यामुळेच कोणी धरणावर तर कोणी धबधब्यावर जात असतात. पण हे पर्यटन करताना सुरक्षाही तेवढीच महत्वाची आहे. पण त्याकडे कोणी फारसं लक्ष देत नाही, असे गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांवरून दिसून येते. अशीच एक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. पाच मित्र कॉलेज बुडवून धरणावर फिरायला गेले. पण पुढे जे झालं ते भयंकर होतं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पिंपरी-चिंचवडच्या थेरगाव येथे एम. एस. कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या पाच विद्यार्थांनी कॉलेजला दांडी मारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कासारसाई धरणावर फिरायला जाण्याचा प्लॅन केला. याची कल्पना ना त्यांच्या पालकांना होती ना शिक्षकांना होती. हे पाचही जण धरण परिसरात पोहोचले. तिथे त्यांनी मजा करायला सुरूवात केली. शिवाय त्यात त्यांना धरणाच्या पाण्यात उतरण्याचा मोह आवरला.
ट्रेंडिंग बातमी - मुंबईत जोरदार पाऊस, पुढील 24 तासात धो-धो बरसणार
त्यानंतर ते पाचही जण धरणाच्या पाण्यात उतरले. ते पाण्यामध्ये खेळण्यात दंग होते. खेळता खेळता त्यातील एक जण खोल पाण्यात गेला. तिथे त्याला पाण्याचा अंदाज आलाच नाही. तो काही क्षणातच पाण्यात वाहून गेला. त्यावेळी इतर तार मित्रांनी आरडाओरडा केला. त्यानंतर गावातील नागरिकांनी शिरगावं परंदवाडी पोलिसांना तात्काळ या घटनेची खबर दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी लगेच सुत्र हलवली. त्यांनी वन्यजीव रक्षक मावळ, तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण केले. रेस्कु टीमने काही वेळातच या विद्यार्थ्यांला शोधून काढले. पण खूप उशीर झाला होता. पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह रेस्क्यू टिमने बाहेर काढला. सारंग रामचंद्र डोळसे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याचं वय अवघं सतरा वर्षाचं आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world