 
                                            ऑस्ट्रेलियाच्या आणखी एका प्रतिभावंत आणि तरुण क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू झालाय. यापूर्वी फिलिप्स ह्यूज या क्रिकेटपटूचा सिडनीतील एका मैदानात सुरू असलेल्या सामन्यादरम्यान मृत्यू झाला होता. फिलीप्सप्रमाणेच अवघ्या 17 वर्षांच्या बेन ऑस्टिनचा मानेवर बॉल आदळल्याने मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना मंगळवारी मेलबर्नमध्ये घडल्याचे सांगण्यात आले आहे. बेन हा T20 सामन्याची तयारी करत असताना ही दुर्घटना घडली. बॅटींगच्या सरावासाठी हल्ली बॉल फेकणारी मशीन वापरली जातात. या मशीनने फेकलेला बॉल मानेवर लागल्याने ही दुर्घटना घडली. मानेवर बॉल लागल्याने बेन जागीच कोसळला होता, ज्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
प्रतिभावंत अष्टपैलू क्रिकेटपटूची दुर्दैवी एक्झिट
बेनच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की ही बातमी आमचे विश्व उद्ध्वस्त करणारी आहे आणि बेनचा मृत्यू हा त्यांच्यासाठी जीवाला चटका लावणारा आहे. बेन एक अत्यंत प्रतिभावंत क्रिकेटपटू म्हणून उदयास येत होता. तो अष्टपैलू होता आणि बॅटींग तसेच बॉलिंगमध्ये फार सुंदर कामगिरी करत होता. बेन हा फर्न्ट्री गली क्रिकेट क्लबतर्फे खेळत होता आणि या क्लबने त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. "स्टार क्रिकेटर, चांगला लीडर आणि एक जबरदस्त तरुण व्यक्तिमत्व" अशा शब्दात या क्लबने बेनला श्रद्धांजली वाहताना कौतुकोद्गार काढले.
नक्की वाचा: Ind vs AUS T20 Schedule वनडेनंतर टी20 चा थरार! कधी आणि कुठे रंगणार सामना? पाहा संपूर्ण वेळापत्रक
फिलीप्स ह्युजच्या मृत्यूची आठवण
बेनचा ज्या पद्धतीने मृत्यू झाला त्यामुळे 2014 साली झालेल्या फिलीप्स ह्युजच्या मृत्यूची आठवण ताजी झाली. एका सामन्यादरम्यान त्याच्याही मानेवर बॉल आदळला होता. बेनच्या मृत्यूमुळे क्रिकेट खेळत असताना खेळाडूंच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष, माईक बेअर्ड यांनीही सदर घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि या घटनेतून धडा घेणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. बेनच्या कुटुंबियांना मानसिक आधार देणे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेणे ही आपली प्राथमिकता असल्याचे बेअर्ड यांनी म्हटले आहे.
The thoughts of the entire cricketing community are with the loved ones of 17-year-old Ben Austin, who has passed away after a tragic accident at cricket training: https://t.co/r0ZDYvbqRK pic.twitter.com/sAx74AoQuv
— cricket.com.au (@cricketcomau) October 30, 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
