
भारत आणि ऑस्ट्रेलिया ( India Vs Australia Boxing Day Test Match) यांच्यात चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पाच सामन्यांची ही मालिका सध्या रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असून पहिल्या दिवसापासूनच मैदानात शाब्दीक चकमकी झडण्यास सुरुवात झाली आहे.
Heated moment between Virat kohli and Sam Konstas pic.twitter.com/3BF3FSB4zw
— Embedded by Toxify (@toxify_v18) December 26, 2024
26 डिसेंबरपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोहली कॉन्स्टासला भिडला
सामन्याच्या पहिल्या सत्रातच दोन्ही संघ आक्रमक भूमिकेत शिरताना पाहायला मिळाले. सामन्याच्या 10 व्या ओव्हरमध्ये मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला भारताचा आघाडीचा फलंदाज विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कॉन्स्टासला धक्का मारला. कॉन्स्टासला धक्का मारलेलं अजिबात आडलं नाही त्यामुळे तो कोहलीकडे पाहून काहीतरी बडबडला, यामुळे कोहलीला राग आला ज्यामुळे दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडणार अशी चिन्हे दिसायला लागली होती. परिस्थिती शांत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि पंचांनी मध्यस्थी केली आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
नक्की वाचा : टीम इंडियाचा 'गाबा टॅक्स' बंद होणार का?
कोहलीवर कारवाईची शक्यता, कॉन्स्टासलाही शिक्षा होणार ?
मैदानात घडलेल्या या प्रसंगामुळे कोहली आणि कॉन्स्टास या दोघांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. कारण मैदानात घडलेला हा प्रकार आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग करणारे आहे. नियमांचा भंग कोणी केला हे मैदानातील पंचांना कळवायचे असते, त्यांनी तक्रार केल्यानंतर मॅच रेफरी कोणावर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेत असतात. कोहलीने मुद्दाम कॉन्स्टासला धक्का मारल्याचे दिसले तर आयसीसीकडून त्याला शिक्षा दिली जाऊ शकते, सोबतच कॉन्स्टासलाही शिक्षा होण्याची शक्यता आहे. कारण हा प्रकार घडण्याआधी कॉन्स्टास आणि भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्यातही चकमक झाली होती.
नक्की वाचा : काय आहे Boxing Day Test? ती दरवर्षी 26 डिसेंबरलाच का सुरु होते?
एमसीसीच्या नियम 42.1 नुसार जर एखाद्या क्रिकेटपटूने दुसऱ्या क्रिकेटसोबत असा धक्काबुक्कीचा प्रकार केला तर तो लेव्हल-2 चा अपराध मानला जातो. या नियमभंगासाठी 50 ते 100 टक्के मॅच फी किंवा 1 सस्पेन्शन पॉईंट किंवा 2 सस्पेन्श पॉईंट अशी शिक्षा दिली जाऊ शकते. यानुसार कोहलीला एका कसोटी सामन्यासाठी किंवा दोन एकदिवसीय सामन्यासाठी निलंबित केले जाऊ शकते. यामुळे कोहली 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्याला मुकण्याची दाट शक्यता आहे.
पदार्पणाच्या सामन्यातच वाद
सॅम कॉन्स्टासने आजपासून सुरू झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले आहे. अवघ्या 19 वर्षांच्या सॅमने 65 चेंडूत 60 धावा करत सगळ्यांना प्रभावित केले आहे. कॉन्स्टासला रवींद्र जाडेजा याने एलबीडब्लू करत भारतीय संघाला यश मिळवून दिलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world