
IPL 2025 DC Vs CSK: आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चेन्नईचा 25 पराभव केला. यंदाच्या मोसमातील चेन्नईचा हा सलग तिसरा पराभव आहे. सलग तिन पराभवांमुळे यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचा संघ संकटात सापडल्याची स्थिती आहे अशातच चेन्नईच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून निवृत्त होणार अशा चर्चा अनेक वर्षांपासून सुरु आहेत. मात्र आज चेन्नईचा दिल्लीविरुद्ध सामना सुरु झाल्यानंतर या चर्चांनी जोर धरला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या होमग्राऊंडवर होत असलेला हा सामना पाहण्यासाठी धोनीचे कुटुंबीय आले अन् या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या. नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...
शनिवारी दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आयपीएल 2025 च्या 17 व्या सामन्यात केएल राहुलने अर्धशतक झळकावले. चेन्नई आणि दिल्ली यांच्यातील सामना पाहण्यासाठी दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे कुटुंब एमए चिदंबरम स्टेडियमवर पोहोचले होते. विशेष म्हणजे धोनीचे आई-वडिलही सामना पाहण्यासाठी आले आहेत. या बातमीनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
असा दावा केला जात आहे की धोनीचे वडील पानसिंग धोनी सामना पाहण्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या समोर येत आहेत. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. धोनीच्या पालकांसोबत त्याची पत्नी साक्षी धोनी देखील सामना पाहण्यासाठी आली आहे. चेन्नई सुपर किंग्जने धोनीच्या कुटुंबाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Home sweet Anbuden ft. The Dhonis! 🏠🏟️#CSKvDC #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/Bj1rnt1nCw
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 5, 2025
धोनीची आयपीएल कारकीर्द शानदार राहिली आहे. त्याने 2008 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. धोनीने आतापर्यंत 268 सामने खेळले आहेत. या काळात त्याने 5289 धावा केल्या. धोनीने आयपीएलमध्ये 24 अर्धशतकेही झळकावली आहेत. सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की इतक्या वर्षांत धोनीचे पालक कधीही सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले नाहीत, त्यामुळे तो मोठा निर्णय घेऊ शकतो.
दरम्यान, या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली. पण यानंतर त्याला सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता. पण यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सने त्यांना पराभूत केले.
IPL 2025 : मुंबई इंडियन्समध्ये काय चाललंय? भर मॅचमध्ये 'सूर्या'चा पारा चढला, कोचला घ्यावी लागली धाव!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world