आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचा लिलाव आज जेद्दाह सौदी अरेबिया येथे पार पडतो आहे. आगामी हंगामासाठी प्रत्येक संघाने महत्वाच्या खेळाडूंना संघात कायम राखलं असून अनेक महत्वाचे खेळाडू लिलावात उतरणार आहेत. लिलावात उतरलेल्या प्रत्येक खेळाडूला महत्वाच्या संघांकडून खेळण्याची इच्छा असते. परंतु कर्नाटकचं प्रतिनिधीत्व करणारा अष्टपैलू कृष्णप्पा गौथमने आपलं थेट आणि परखड मत मांडताना मला पंजाब किंग्ज संघाकडून खेळायचं नसल्याचं म्हटलंय.
पंजाबकडून खेळताना आपल्याला कधीच चांगला अनुभव आला नसल्याचं कृष्णप्पा गौथमने म्हटलं आहे. 36 वर्षीय कृष्णप्पा गौथमवर पंजाबने 2020 मध्ये 6.20 कोटींची बोली लावली होती. परंतु या संपूर्ण हंगामात कृष्णप्पाला अवघा एक सामना खेळायला मिळाला. लिलावाआधी एका खासगी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये कृष्णप्पाला तुला कोणत्या संघाकडून खेळायला आवडणार नाही असं विचारलं असता त्याने, मला पंजाबकडून खेळायचं नाहीये असं म्हटलंय.
हे ही वाचा - IPL 2025 Mega Auction LIVE Updates: मेगा ऑक्शनपूर्वी कोणत्या टीमकडं किती रक्कम? वाचा सर्व अपडेट्स
"मला पंजाबकडून कधीही चांगला अनुभव आला नाही. क्रिकेट सोडूनही अनेक गोष्टी यासाठी लागू आहेत. एका क्रिकेटपटूला ज्या पद्धतीने वागवलं जातं ते मला योग्य वाटलं नाही. जेव्हा मी एखाद्या संघाकडून खेळत असतो तेव्हा मी माझं 100 टक्के योगदान देतो, हातचं राखून खेळणं मला कधीही जमलं नाही. परंतु पंजाबने जर मला या लिलावात निवडलं तर मात्र मी माझी 100 टक्के कामगिरी करु शकणार नाही."
कृष्णप्पा गौथमने आतापर्यंत IPL मध्ये 36 सामने खेळले असून 8.24 च्या इकोनॉमीने 21 विकेट घेतल्या आहेत. याव्यतिरीक्त फलंदाजीत कृष्णप्पा गौथमच्या नावावर 166.89 च्या स्ट्राईक रेटने 247 धावा जमा आहेत. यंदा होणाऱ्या लिलावात कृष्णप्पा पंजाब किंग्ज हा संघ 110.50 कोटींची पर्स अमाऊंट घेऊन उतरणार आहे.
हे ही वाचा - IPL 2025 : शाहरुखचा 'बाजीगर' कुणाचा होणार 'डॉन'?, आयपीएल विजेत्या कॅप्टनसाठी 3 टीममध्ये चुरस
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world