
IPL 2025 KKR Vs MI: आयपीएल 2025 चा बारावा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये पार पडला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने कोलकाताच्या संघाला 8 विकेट्सने धुळ चारली. कोलकाताने दिलेल्या 117 धावांचे आवाहन मुंबईने अवघ्या 13 षटकांमध्ये पूर्ण केले. मुंबईच्या रायन रिकल्टनने शानदार अर्धशतक झळकावत संघाचा विजय सोपा केला. तसेच पदार्पणातच 5 विकेट्स घेत केलेल्या चमकदार कामगिरीमुळे मुंबईचा अश्वनी कुमार या सामन्याचा हिरो ठरला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोलकाताच्या संघाने दिलेल्या 117 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवातही खराब झाली. मुंबईच्या सलामवीरांनी धमाक्यात सुरुवात केली मात्र रोहित शर्मा लवकर आऊट झाला. मुंबई इंडियन्सची पहिली विकेट रोहित शर्माच्या रूपाने पडली. तो 12 चेंडूत 13 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. आंद्रे रसेलने रोहितला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर विल जॅक्स आणि रिकल्टनने संघाचा डाव सावरला. रायन रिकल्टनने शानदार अर्धशतक झळकावले. तो 41 चेंडूत 62 धावा करुन नाबाद राहिला.
A different 'Monday Blues' for @mipaltan 💙#MI register a convincing 8⃣-wicket victory over #KKR and are up and away in #TATAIPL 👌💙
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2025
Scorecard ▶ https://t.co/iEwchzEpDk#MIvKKR pic.twitter.com/FtEfP0HDtJ
सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा हा विश्वास सार्थ ठरवत केकेआरच्या संघाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले. प्रथम फलंदाजी करताना केकेआरची सुरुवात खराब झाली, पॉवरप्लेमध्येच त्यांनी चार विकेट गमावल्या. त्यामुळे केकेआरचा डाव गडगडला.
केकेआरकडून अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक 26 धावा केल्या. रमणदीप सिंगने शेवटी 22 धावा जोडल्या. त्याने 12 चेंडूंचा सामना केला आणि 2 षटकार आणि एक चौकार मारला. मुंबईसाठी अश्विनी कुमारने पदार्पणाच्या सामन्यातच धुमाकूळ घातला. त्याने 3 षटकांत 24 धावा देत 4 बळी घेतले. दीपक चहरने 2 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले. हार्दिक पंड्या, विघ्नेश पुथूर, मिशेल सँटनर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
IPL 2025 : भन्नाट कॅच, पहिल्याच बॉलवर विकेट! कोण आहे मुंबईचा नवा स्टार Ashwani Kumar?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world