IPL 2025 Auction : पहिल्यांदा खेळाडूंना मॅच फी, भारतीय खेळाडूंनाही कठोर नियम; BCCI कडून नियमावली जाहीर

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची नुकतीच बंगळुरु येथे एक बैठक झाली या बैठकीत आगामी २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी प्लेअर रिटेंन्शन पॉलिसी जाहीर करण्यात आली.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

आयपीएलच्या आगामी हंगामासाठी बीसीसीआयने जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी हंगामासाठी होणाऱ्या लिलावाआधी प्रत्येक संघमालकांना आपल्या संघातील काही खेळाडूंना संघात कायम राखण्यासाठी काही नियम दिले जातात. या नियमांचं पालन करुनच प्रत्येक संघमालकांना खेळाडूंना संघात स्थान द्यायचं असतं.

आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची नुकतीच बंगळुरु येथे एक बैठक झाली या बैठकीत आगामी २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी प्लेअर रिटेंन्शन पॉलिसी जाहीर करण्यात आली. काय असतील हे नियम जाणून घ्या सविस्तर....


१) IPL चे संघमालक त्यांच्या सध्याच्या संघातील 6 खेळाडूंना कायम राखू शकतात म्हणजेच रिटेन करु शकतात. ही प्रक्रिया थेट नावांची घोषणा करुन किंवा मग RTM (Right to Match) कार्डाद्वारे केली जाऊ शकते.

२) ६ खेळाडूंना संघात कायम राखण्याचं गणित कसं जमवायचं हे संपूर्णपणे संघमालकांवर अवलंबून असेल. परंतु या प्रक्रियेमध्ये (भारतीय आणि परदेशी) Capped खेळाडू हे जास्तीत जास्त 5 असू शकतात. Uncapped खेळाडूंना संघात कायम राखण्यासाठीची मर्यादा ही २ खेळाडूंची आहे.

३) IPL 2025 Auction साठी प्रत्येक संघमालकांना 120 Cr. ची पर्स अमाऊंट मिळेल. प्रत्येक खेळाडूना मिळणारं मानधन हे आता त्याला लिलावात मिळालेली रक्कम आणि त्याचसोबत मॅच फी आणि सामना संपल्यानंतर मिळणाऱ्या बक्षीसाची रक्कम यावर ठरेल.

४) IPL मध्ये पहिल्यांदाच मॅच फी ही संकल्पना राबवली जाणार आहे. प्लेईंग ११ मधला प्रत्येक खेळाडू ज्यात Impact Player चा ही समावेश असेल त्यांना ७.५ लाखांचं मानधन मिळेल.

५) परदेशी खेळाडूंना आता लिलावासाठी स्वतःचं नाव नोंदवावं लागेल. जर एखादा खेळाडू यंदाच्या लिलावासाठी नाव नोंदवण्यात अयशस्वी ठरला तर त्याला पुढील हंगामासाठीही आपलं नाव नोंदवता येणार नाही.

६) एखाद्या खेळाडूने आपलं नाव लिलावासाठी नोंदवल्यानंतर त्याची एखाद्या संघात निवड झाली आणि जर त्याने नवीन सिझनला सुरुवात होण्याआधीच माघार घेतली तर पुढील दोन हंगाम त्याला IPL खेळता येणार नाही.

७) BCCI च्या करारयादीत स्थान न मिळालेले, गेल्या 5 वर्षांच्या काळात भारतीय संघाकडून (वन-डे, टेस्ट आणि टी-२०) यापैकी एकाही प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्लेईंग ११ मध्ये स्थान न मिळालेले भारतीय खेळाडू आता Uncapped खेळाडू म्हणून ओळखला जाईल.

८) Impact Player चा नियम हा IPL मध्ये 2027 पर्यंत कायम राहील.

Topics mentioned in this article