जाहिरात

CSK vs MI: धोनीने इतिहास रचला! IPL मध्ये 'असं' महारेकॉर्ड बनवणारा पहीला खेळाडू ठरला

चेन्नईने आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धुळ चारली आहे. मात्र मुंबईने दिलेल्या 156 धावांचे लक्ष्य गाठताना चेन्नईची मात्र चांगलीच दमछाक झाली.

CSK vs MI: धोनीने इतिहास रचला! IPL मध्ये 'असं' महारेकॉर्ड बनवणारा पहीला खेळाडू ठरला

Dhoni record in IPL: भारतीय माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. चेन्नई विरुद्ध मुंबई हा सामना झाला. त्यानंतर त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहे. या सामन्यात धोनीने सुर्यकुमार यादवला स्टम्प आऊट केलं. त्याच्या या स्टम्पींगचं सगळ्यांनीच कौतूक केलं. सुर्या सुद्धा हैराण झाला होता. मात्र सुर्याला स्टम्प करताच धोनीने एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे. आयपीएलमध्ये सर्वात जास्त स्टम्प आऊट करण्याचं रेकॉर्ड धोनीने आपल्या नावावर केलं आहे. धोनीने आतापर्यंत 264 सामन्यात 43 जणांना स्टम्प आऊट केलं आहे. धोनीनंतर दिनेश कार्तिक याचा नंबर लागतो. त्याने आतापर्यंत 37 जणांना स्टम्प आऊट केलं आहे. या शिवाय चेपॉकवर  सर्वाधिक टी 20 सामने खेळण्याचं रेकॉर्डही धोनीने आपल्या नावावर केलं आहे. त्याने आतापर्यंत चेपॉकवर 75 सामने खेळले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनीने काही खास फलंदाजी केली नाही. पण फलंदाजीला येवून नॉट आऊट राहात त्याने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावावर केलं आहे. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना धोनी सर्वात जास्त वेळा नॉट आऊट राहीला आहे. जवळपास 29 वेळा धोनी नॉटआऊट राहीला आहे. धोनी मुंबई विरुद्धच्या सामन्यात दोन चेंडू खेळला. त्याला एकही धाव काढता आली नाही. पण तो या सामन्यात नाबाद राहीला.  

ट्रेंडिंग बातमी - SRH Vs RR: रोमहर्षक लढतीत हैदराबादचा विजय, राजस्थानचा पराभव, दुबेची झुंझार खेळी व्यर्थ

आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक वेळ नाबाद राहीलेले खेळाडू  (Most times remaining Not Out in Successful Chases in IPL)

29* - एमएस धोनी
27 - रवींद्र जडेजा
24 - दिनेश कार्तिक
22 - यूसुफ पठान
22 - डेविड मिलर
21 - विराट कोहली
20 - डीजे ब्रावो

ट्रेंडिंग बातमी - IPL 2025: चेन्नईच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी! यंदाच्या आयपीएलनंतर धोनीची निवृत्ती? माहीने सांगून टाकलं

चेन्नईने आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला धुळ चारली आहे. मात्र मुंबईने दिलेल्या 156 धावांचे लक्ष्य गाठताना चेन्नईची मात्र चांगलीच दमछाक झाली. चेन्नईने विजयाचे लक्ष 20 व्या षटकात पूर्ण केले. धोनीला ही आठव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरावे लागले. चेन्नईने लक्षाचा पाठलाग करताना 6 विकेट गमावल्या. चेन्नईकडून सर्वाधिक 65 धावा रचिन रविंद्रने केल्या. तर मुंबईने आयपीएलमध्ये पहिल्या सामन्यात पराभूत होण्याची परंपरा कायम राखली.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: