स्वानंद पाटील, बीड
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलीवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयानंही दखल घेतली आहे. बदलापूरमधील दुर्दवी घटना ताजी असतानाच बीडमध्येही तसाच एक संतापजनक प्रकार उघड झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बीडमध्ये 11 वर्षांच्या मुलीवर उर्दू शिकवणारा शिक्षक सहा महिन्यांपासून बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेख रियाज शेख जमीर असं या आरोपीचं नाव आहे. त्यानं पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. हा प्रकार उघड होताच बीड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. शिक्षकानंच मुलीवर बलात्कार केल्याच्या या घटनेनं बीड शहरात खळबळ उडाली आहे.
( नक्की वाचा : 'माझी मुलगी तर फक्त...' कोलकाता बलात्कार पीडिताच्या आईचं भावुक करणारं पत्रं, तुम्ही वाचलं का? )
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मदिया कॉलनीत भागात राहणारा रियाज त्याच्या राहत्या घरी उर्दू आणि अरबी भाषेची शिकवणी घेतो. यामध्ये प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी होती. घरी कोणी नसताना नराधम हे कृत्य करत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानं अनैसर्गिकपद्धतीनं बलात्कार केल्याचीही माहितीही तपासात उघड झाली आहे.
( नक्की वाचा : Renukaswamy Murder : सुपरस्टार बनला व्हिलन, 'प्रायव्हेट पार्ट' ला विजेचे झटके देऊन केली फॅनची हत्या )
पीडित मुलीने आई - वडिलांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पीडितेच्या आई - वडिलांनी तात्काळ पेठ बीड पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पीडित मुलगी उर्दू तसंच धार्मिक शिक्षण घेण्यासाठी पाच ते सात महिन्यांपासून जात होते. शिकवणीच्या ठिकाणी तिच्यावर सात ते आठ वेळा अत्याचार करण्यात आला, अशी माहिती पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिली. आरोपीवर बाललैंगिक कायदा पोस्को नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world