
Guruling Hasure Murder Case : लातूर जिल्ह्यातील निलंग्यातील कासार शिरसी इथे गुरुलिंग हासुरे (38 वर्षे) यांचा खून करण्यात आला होता. हासुरे आपल्या शेतात काम करत असताना त्यांचा खून करण्यात आला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लातूर जिल्ह्यातील शिक्षकाच्या खून प्रकरणी (Latur Teacher Murder CaseI पोलिसांनी 2 आरोपींना हैदराबादमधून अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील अटकेत असलेल्या आरोपींची एकूण संख्या आता 9 झाली आहे. या शिक्षकाचा गेल्या महिन्यात खून झाला होता. खून झाल्यापासून दोन आरोपी फरार झाले होते. या दोघांच्या मागावर पोलीस होते अखेर शुक्रवारी या दोघांना अटक करण्यात आली.
अझर मोहम्मद आणि गजेंद्र सरवदे अशी या आरोपींची नावे आहेत. या दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 13 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अजय पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. गुरुलिंग हासुरे (38 वर्षे) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. निलंग्यातील कासार शिरसी पोलीस ठाण्यात त्यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नक्की वाचा - Kalyan : नवव्या वर्षी बेपत्ता झाली मुलगी, दोन मुलांची आई होऊन घरी परतली! कल्याणमधील धक्कादायक प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 26 एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान दोन गटात वाद झाला होता. हा वाद तेव्हा शांत झाला होता मात्र दुसऱ्या दिवशी एका गटातील काही जणांनी वाद का असे विचारत पुन्हा वादाला सुरूवात केली होती. या वादातून गुरुलिंह हासुरे यांचा खून करण्यात आला होता.
या प्रकरणी एकूण 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील दोघेजण फरार होते. पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की सदर प्रकरणातील दोन आरोपी हे हैदराबादला पळून गेले आहेत. त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसांनी आरोपींना शोधून काढत त्यांना अटक केली आहे.
Shirdi News: दुबईतून शिर्डीत आले 'गोल्डन ॐ साई', साईभक्ताकडून भरभरुन दान, किंमत किती?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world