जाहिरात

Akola Crime: वर्ग मैत्रिणीच्या बापाचे दुष्कृत्य! टाय लावण्याच्या बहाण्याने घरात घेतलं अन्.. अकोल्यातील संतापजनक घटना

वर्ग मैत्रिणीच्या बापाने वाईट उद्देशाने स्पर्श केल्याने वर्गशिक्षकेला माहिती दिल्यानंतर महिला हेल्पलाइन क्रमांकावर केल्यानंतर घटना उघड झाली.

Akola Crime: वर्ग मैत्रिणीच्या बापाचे दुष्कृत्य! टाय लावण्याच्या बहाण्याने घरात घेतलं अन्..  अकोल्यातील संतापजनक घटना

योगेश शिरसाट, अकोला: अकोल्यात एका चौथ्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचा तिच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलीच्या बापानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अकोल्याच्या जुने शहर पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून वर्ग मैत्रिणीच्या बापाला अटक केली आहे. दरम्यान तक्रारीत वर्ग मैत्रिणीच्या बापाने वाईट उद्देशाने स्पर्श केल्याने वर्गशिक्षकेला माहिती दिल्यानंतर महिला हेल्पलाइन क्रमांकावर केल्यानंतर घटना उघड झाली. याप्रकरणी जुने शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, अकोला पातुर रोडवरील एका गावात जिल्हा परिषदच्या चौथ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत हा सर्व प्रकार घडला आहे. दरम्यान जुने शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली रस्त्यातच आपल्या वर्ग मैत्रिणीला सोबत घेण्यासाठी तिच्या घराजवळ गेली असता त्याच ठिकाणी "सत्यपाल सावध" या वर्गमैत्रिणीचा बाप तिथेच होता.

Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक प्रकरणात 9 जणांना जन्मठेप, देशातील पहिली कारवाई!

यावेळी त्याने माझ्या मुलीची "टाय व्यवस्थित करून दे असे म्हणत पीडित अल्पवयीन मुलीला सत्यपाल सावध'ने घरात बोलावले. आपल्या वर्गमैत्रिणीची टाय सरळ करण्यासाठी गेलेल्या सावध'नेच मुलीला आधीच या इशाऱ्यातून 'सावध' केले होते. मात्र निष्पाप या कोवळ जीवाच्या अज्ञात मुलीला हे कळले. या संधीचा फायदा उचलून सत्यपाल सावधने मुलीच्या तोंडावर हात फिरवून तिच्या शरीराला वाईट हेतूने स्पर्श करून तिचा विनयभंग केला.

याच दरम्यान ती रडायला लागली तेव्हा पीडित अल्पवयीन मुलीला पैसे देण्याचे आमिष देऊन ही गोष्ट कोणालाही सांगू नको असं म्हटलं.. मात्र मुलीने आरोपीच्या तावडीतून आपली सुटका केली.  भयावय अवस्थेत असलेल्या पीडित मुलगी हे शाळेत जाऊन पायऱ्यावरच रडत बसली. वर्गशिक्षिका तिच्याजवळ आली व तिची चौकशी केल्यानंतर घाबरलेल्या मुलीची कहाणी तिने आपल्या वर्गशिक्षकेला सांगितली. दरम्यान वर्गशिक्षिकेने तिच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली.

Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? गुन्हेगाराचा पोलीस स्टेशनमध्येच तोडफोड करत राडा

याप्रकरणीची तक्रार अकोल्याच्या जुने शहर पोलीस स्टेशनला दिली असून मुलीला वाईट हेतूने स्पर्श करणाऱ्या सत्यपाल सावध विरोधात जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्याच्या विरोधात 74,75 बीएनएसनुसार विविध कलमाने आणि बाल संरक्षण कायद्यानुसार कारवाई करून आरोपीला अटक केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com