
आकाश सावंत, प्रतिनिधी
Beed News : गुन्हेगारी घटनांसाठी बीड जिल्हा सध्या राज्यात चर्चेत आहे. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रकरणांना आळा घालण्याची मागणी सातत्यानं होत आहे. पण, त्यानंतरही या प्रकराच्या घटना सुरुच आहेत. नुकत्याच झालेल्या एका घटनेनं बीड जिल्हा हादरला आहे.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील युसुफवडगाव परिसरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून दोन तरुणांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक तरुण मृत्युमुखी पडला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दोघेजण मोटारसायकलवरून जात असताना आरोपींनी त्यांची वाट अडवून जबरदस्तीने शेतात नेले. त्यानंतर दोघांनाही झाडाला दोरीने बांधून काठी आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. या अमानुष मारहाणीत ज्ञानेश्वर दत्तात्रय धपाटे या 27 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. युवकाचा गंभीर दुखापतीमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
( नक्की वाचा : Love Affair : 12 वर्षांनी लहान असलेल्या मुलाच्या प्रेमात पडली शिक्षिका, नवरा आणि 3 मुलांना सोडलं, वाचा पुढे काय झालं.... )
ही घटना उघडकीस येताच युसुफवडगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात अनैतिक संबंधाच्या संशयातून ही हल्ल्याची घटना घडल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात आरोपींना ताब्यात घेतले असून, एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
या अमानवी घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world