
ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Digital arrest of Rs 58 crore in Mumbai : गेल्या काही दिवसांपासून डिजिटल अरेस्टच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. ऑनलाइन माहिती अभावी नागरिक याला बळी पडतात. सोशल मीडियाचा वापर करून कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही, त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारचा फेक कॉल किंवा व्हिडिओ आल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.
मुंबईतील एका वृद्ध दाम्पत्याला डिजिटल अरेस्टमुळे 58 कोटींना गंडा घालण्यात आला आहे. शेअरचा व्यवहार करणाऱ्या 72 वर्षीय वृद्ध उद्योगपती आणि त्याच्या पतीची आर्थिक फसवणूक करण्यात आली. हे आतापर्यंतच सर्वात मोठं डिजिटल अरेस्ट असल्याचं सांगितलं जात आहे. फसवणूक करणाऱ्यांनी स्वतःला ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) अधिकारी म्हणून ओळख सांगितली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याचा विश्वास संपादन केला. यानंतर आरोपींनी दोन महिनाभरात दाम्पत्याला वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. आरोपीच्या विविध अकाऊंटमध्ये 25 लाखांची रक्कम जमा केली जात होती.
नक्की वाचा - Ahilyanagar: ED, सुप्रीम कोर्टाचे नाव, WhatsApp Video Call ने श्रीरामपूरच्या डॉक्टरांना कोट्यवधीचा गंडा
याबाबत पीडित उद्योगपतीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 19 ऑगस्ट रोजी त्यांच्याशी पहिल्यांदा संपर्क केला. त्यावेळी आरोपींनी आपली नावं सुब्रमण्याम आणि करण शर्मा असल्याचं सांगितलं. ते वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल करीत होते. याशिवाय व्हॉट्सअॅपवर कॉल करीत होते. आपण सीबीआय आणि ईडीचे अधिकारी असल्याचं भासवत होते. याशिवाय ते दोघांना 'डिजिटल अरेस्ट' ची धमकी देत होते.
मनी लॉन्डरिंग प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सांगून "तपासासाठी पैसे द्या, नाहीतर अटक करू" अशी धमकी ही वृद्ध दांपत्याला दिली. दोन महिन्यांच्या कालावधीत विविध बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करायला लावले. आरोपींनी 18 वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे घेतले, त्यात प्रत्येकाच्या वैयक्तिक खात्यात 25 लाख जमा झाले. ज्या खात्यांमध्ये हे पैसे जमा झाले आहेत त्या खात्यांची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. 19 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर 2025 दरम्यान, व्यावसायिकाने आरटीजीएसद्वारे एकूण 58.13 कोटी रुपये आरोपींनी दिलेल्या अनेक बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले. दरम्यान या प्रकरणी सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world