जाहिरात

16 लाखांच्या बाईकस्वाराचे 'भंगार'धंदे! पोलिसांनी धडा शिकवताच हात जोडले

विशेष म्हणजे मुलींसोबत prank चे रील तयार करून हा रायडर स्वतःच्या इन्स्टाग्रामवर टाकायचा.

16 लाखांच्या बाईकस्वाराचे 'भंगार'धंदे! पोलिसांनी धडा शिकवताच हात जोडले
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar: कोणाल कधी काय सुचेल आणि तो काय कृती करेल याचा काही नेम नाही. मात्र हे करत असताना त्याचा परिणाम ही अनेकांना भोगावे लागतात. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे. शहरात पोलिसांनी बाईकवर मुलींसोबत prank करणाऱ्या बाईक रायडरला दणका दिला आहे. हा तरुण महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढायचा.  मुलीजवळ जाऊन स्पोर्ट बाईकचा आवाज काढायचा. तो ऐवढ्यावरच थांबायचा नाही तर तो   आक्षेपार्ह ही बोलायचा. त्याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. त्याचीच चर्चा सध्या शहरात सुरू आहे. 

विशेष म्हणजे मुलींसोबत prank चे रील तयार करून हा रायडर स्वतःच्या इन्स्टाग्रामवर टाकायचा. याबाबत पोलिसांनी या रिल्सची दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याला अटक केली आहे. शेख समीर शेख सलीम असे त्याचे नाव आहे. तसेच त्याच्यासोबत रील तयार करणाऱ्यावर सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दणका देताच या तरुणाने आपण केलेल्या चुकीचा व्हिडिओ करत माफी देखील मागितली आहे. मात्र या तरुणाची प्रोफाइल बघितल्यावर तुम्हाला देखील धक्का बसेल. कारण तो तब्बल 16 लाखांची स्पोर्ट बाईक वापरत होता. पण त्याचे कारनामे मात्र भंगार होते. 

नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : 'घरी कधी येताय?' असं विचारणाऱ्या लेकीने घेतला गळफास, संभाजीनगरचा धक्कादायक प्रकार

समीर शेख शहरातील बाजीपुरा परिसरातील गल्ली नंबर 19 मध्ये राहतो. समीर हा भंगार व्यावसायिक आहे. शिवाय तो स्वतःला बाईक रायडर समजतो. काही दिवसांपूर्वी रायडिंग करताना त्याचा अपघात झाला होता. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर रिल्स बनवायला सुरुवात केली. इंस्टाग्रामवर त्याचे दीड लाख फॉलोवर्स आहेत हे विशेष. रील बनवताना तो महागड्या गाड्या वापरत असल्याचं पाहायला मिळतं. ज्या स्पोर्ट बाईकवर त्याने रिली बनवून मुलींना घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि दहशत निर्माण केली त्या स्पोर्ट बाईकची किंमत 16 लाख रुपये आहे.

'' जो कोणी आरोपीचा हात, पाय आणि लिंग कापेल...", ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; अकोल्यात खळबळ 

यापूर्वी त्याने महागडी मर्सडीज खरेदी केली होती. पुढे ती विक्री करून फॉर्च्यूनर कार घेतली असल्याची माहिती मिळत आहे. रील बनवताना समीर शेख अनेकदा महागड्या गाड्यांचा वापर करताना दिसतो. पोलिसांनी या प्रकरणी समीर शेख आणि त्याच्यासोबत रील बनवणाऱ्या इतर साथीदारांवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे समाजात युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुणाईकडून अशा प्रकारे बेजबाबदार आणि गुन्हेगारी कृत्ये केली जात आहेत. असे प्रकार रोखायचे असतील तर पोलिसांनी संपूर्ण शहरात जरब बसेल अशी मोठी कारवाई करणे गरजेचे आहे. असे  मत सर्वसामान्य नागरिकांनी आणि खासकरून महिलांनी व्यक्त केले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com