Trending News : ती प्रेमाचं नाटक करायची, लग्नाच्या भूलथापा द्यायची आणि मग समोरच्या व्यक्तीवर खोटा आरोप करून त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करायची. एका 'लुटारु विवाहितीने' उत्तर प्रदेशमध्ये अक्षरशः दहशत निर्माण केली होती. दोन बँक अधिकारी, तीन सरकारी कर्मचारी आणि पोलिसांतील दोन उपनिरीक्षकांसह (दारोगा) 12 हून अधिक लोकांना तिने स्वत:च्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्याकडून करोडो रुपये उकळले. या महिलेचं नाव दिव्यांशी असं असून तिची लुटण्याची पद्धत वाचून तुम्ही थक्क व्हाल.
दिव्यांशीच्या जाळ्यात अडकलेल्या तिच्या पोलीस उपनिरिक्षक पतीनं पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर तिचा पर्दाफाश झाला. या तक्रारीनंतर पोलिसांनी सुमारे एक वर्षांच्या प्रयत्नानंतर या ब्लॅकमेलर महिलेला अटक करुन गजाआड केले आहे.
फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगचा पॅटर्न
दिव्यांशीचा ब्लॅकमेलिंग करण्याचा पॅटर्न निश्चित होता. ती आधी लोकांन प्रेमाच्या भूलथापा देऊन संबंध बनवायची. नंतर, ती त्या व्यक्तींवर बनावट बलात्कार (रेप) प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळत असे.
( नक्की वाचा : Raigad News : 'आई कुठे आहेस तू?' हाक मारली अन् 4 वर्षांची मुलगी बेपत्ता, 48 तासानंतर मोठा ट्विस्ट )
पोलिसांच्या नोंदीनुसार, तिने वेगवेगळ्या वेळी दोन बँक व्यवस्थापकांशी (Bank Managers) लग्न केले. त्यानंतर दोघांवरही बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. मात्र, कोर्टातील सुनावणीदरम्यान तिने स्वत:ची जबानी बदलली.
यानंतर तिने मेरठमध्ये कार्यरत असलेल्या एका उपनिरीक्षकाशी लग्न केले, पण काही दिवसांतच तिने त्याच्यावरही खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल केला. इतकंच नाही तर दिव्यांशीनं तीन सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्धही बलात्काराचे गुन्हे दाखल केले होते, जे नंतर परस्पर सहमतीनं (Settlement) मागे घेण्यात आले.
उपनिरीक्षक पतीलाही लावला गंडा
बुलंदशहर येथील 2019 च्या बॅचचे सब-इन्स्पेक्टर आदित्य कुमार लोचव हे तिचे शेवटचे मोठे शिकार ठरले. एका नातेवाईकाच्या माध्यमातून 17 फेब्रुवारी 2024 रोजी दिव्यांशीसोबत लग्न झाले. लग्नात हुंडा म्हणून स्कॉर्पिओ गाडी आणि लाखो रुपयांचे दागिने देण्याचे आश्वासन तिने दिले होते.
लग्नानंतर तिचा खरा चेहरा समोर आला. बी.एड. (B.Ed.) आणि सी.टीई.टी. (CTET) परीक्षेच्या तयारीचे कारण सांगून ती घरी थांबत नसे आणि जेव्हा यायची, तेव्हा मोबाईलमधून Google Pay आणि PhonePe सारखे सर्व युपीआय ॲप्स (UPI Apps) डिलीट करायची. इतकेच नव्हे तर, ती ड्युटीवर असलेल्या आदित्य यांच्याकडे सातत्याने ऑनलाईन रुपये (Rupees) मागायची, ज्यामुळे आदित्य यांना संशय आला.
( नक्की वाचा : Dombivli News: निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवलीत मोठा शस्त्रसाठा जप्त, राजकीय गुन्हेगाराला बेड्या )
मोबाईल तपासला आणि सत्य बाहेर
लग्नानंतर साधारण 4 महिन्यांनी, आदित्य सुट्टीवर घरी आले असताना त्यांनी दिव्यांशीचा मोबाईल तपासण्यासाठी घेतला. तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली. आदित्य यांनी बळजबरीने युपीआय ॲप्स डाउनलोड करून तिची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री (Transaction History) तपासली. या तपासणीत 10 हून अधिक खात्यांमध्ये झालेले करोडो रुपयांचे व्यवहार (Transactions) पाहून आदित्य यांना धक्का बसला.
या घटनेनंतर दिव्यांशीने आदित्य यांच्याशी भांडण केले आणि थेट माहेरी निघून गेली. 25 नोव्हेंबर 2024 रोजी तिने कानपूर पोलीस आयुक्त कार्यालयात मोठा ड्रामा केला. तिने आदित्य याxच्यावर त्रास देण्याचा आणि 14.50 लाख रुपये हडपल्याचा खोटा आरोप केला. तसेच, उपनिरीक्षक पतीचे अनेक महिलांशी अवैध संबंध असून तो त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचाही आरोप तिने केला. यावेळी तिने आदित्य यांच्याकडे समझोता करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये (One Crore Rupees) इतक्या रकमेची मागणी केली. या त्रासाला कंटाळून आदित्य यांनी दोनदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.
चौकशीत मोठे रॅकेट उघड
उपनिरीक्षक आदित्य यांनी जेव्हा दिव्यांशी चौधरीविरुद्ध शेकडो ठोस पुरावे पोलिसांना सादर केले, तेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी दिव्यांशीच्या बँक खात्यांची तपासणी केली असता, अनेक धक्कादायक खुलासे झाले.
तिच्या खात्यातून मेरठमध्ये तैनात असलेल्या उपनिरीक्षक (दारोगा), निरीक्षक (इन्स्पेक्टर) आणि पोलीस उपाधीक्षक (सीओ) यांच्या खात्यांमध्ये करोडो रुपयांचे व्यवहार आढळले. या तपासणीतून हे स्पष्ट झाले की, दिव्यांशीच्या या ब्लॅकमेलिंग टोळीत काही पोलीस कर्मचारी देखील सामील आहेत.
या लोकांनी दिव्यांशी पकडली गेल्यानंतरही उपनिरीक्षक आदित्य यांच्यावर सातत्याने सहमतीनं तोडगा करण्यासाठी दबाव आणला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world