
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. या गावात एका गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. पण आरोपी राहीला बाजूला त्यागावातल्या लोकांनी पोलीसालाच पकडले. शिवाय त्याचे अपहरण करून त्याला सीमा ओलांडत मध्य प्रदेशात नेण्यात आले. ज्यावेळी ही बातमी पोलीस मुख्यलयात धडकली त्यावेळी पोलीस अधिक्षकांना धक्काच बसला. त्यानंतर ते तातडीने या गावाकडे रवाना झाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याची सीमा मध्य प्रदेशाला लागून आहे. या सीमेवर उमर्टी हे गाव आहे. या नावाची सीमेवर दोन गावं आहेत. त्यातलं एक गाव महाराष्ट्रात आहे तर दुसरं गाव हे मध्य प्रदेशात आहे. यागावात एका गुन्ह्यातील आरोपी लपला असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांचे एक पथक उमर्टी गावात त्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेले होते.
गावात गेल्यानंतर संबधीत आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच वेळी गावातील काहीजण पोलिसांवर धावून गेले. ते येवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या कर्मचाऱ्याला सीमा ओलंडत मध्य प्रदेशाच्या हद्दीत नेले. ही बाबती वाऱ्यासारखी जिल्हा पोलीस मुख्यालयात पोहोचली. ही बातमी ऐकून सर्वच वरिष्ठ अधिकारी हादरून गेले.
त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी हे अॅक्शन मोडवर आले. त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांसह उमर्टी गावाकडे कुच केली आहे. या घटने संदर्भात त्यांनी मध्यप्रदेश पोलीस आणि प्रशासनाशी संपर्क केला आहे. काही करून अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सोडवून आणण्याचे आवाहन आता पोलीसां समोर आहे. शिवाय असं करण्याचं धाडस करणाऱ्यांच्याही मुसक्या आवळाव्या लागणार आहेत. दरम्यान अपहरण केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका करण्यात यश आलं आहे. त्याला मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात सुखरूप आणलं गेलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world