जाहिरात
This Article is From May 11, 2024

डॉक्टर पत्नीला पतीने 2 बॉयफ्रेंड्ससोबत हॉटेलवर रंगेहात पकडलं; तिघांनाही धू-धू धुतलं, VIDEO

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर पती-पत्नी यांच्यात मागील दोन वर्षांपासून वाद सुरु होता. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते.

डॉक्टर पत्नीला पतीने 2 बॉयफ्रेंड्ससोबत हॉटेलवर रंगेहात पकडलं; तिघांनाही धू-धू धुतलं, VIDEO

उत्तर प्रदेशमध्ये एका डॉक्टरने आपल्या डॉक्टर पत्नीला दोन बॉयफ्रेंडसह हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं. हॉटेलमध्ये तिघेही आपत्तीजनक स्थितीमध्ये आढळले. यानंतर खवळलेल्या डॉक्टर आणि त्यांच्या नातेवईकांनी पत्नी आणि बॉयफ्रेंड्सना धू-धू धुतलं आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत महिला आणि तिच्या दोन बॉयफ्रेंण्ड्ना अटक करण्यात आली आहे. शांतता भंग केल्याप्रकरणी सर्वांवर कारवाई करण्यात आली आहे. 

(नक्की वाचा - माणूस की हैवान! आईसह पत्नीचा खून केला, 3 लेकरांना संपवलं, स्वत: केली आत्महत्या) 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर पती-पत्नी यांच्यात मागील दोन वर्षांपासून वाद सुरु होता. त्यामुळे दोघेही वेगळे राहत होते. पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहे. आपली पत्नी दोन तरुणांसह एका हॉटेलमध्ये थांबली आहे, याची माहिती तिच्या पतीला मिळाली होती. या माहितीच्याआधारे पती आपल्या काही नातेवाईकांसह हॉटेलमध्ये आला. तिथे त्यांनी तिघांनाही रंगेहात पकडलं. त्यानंतर या सर्वांनी तिघांनाही जबर मारहाण केली. 

(नक्की वाचा - 6 महिन्याच्या बाळाचे अपहरण,'ते' 6 जण अन् 26 लाखाची किंमत)

पतीने दिलेल्या माहितीनुसार, 2013 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. मात्र पत्नीचे काही तरुणांसोबत अनैतिक संबध होते. त्यामुळे दोघांमध्ये वाद होते. मात्र पोलीस पत्नीची देखील बाजू ऐकून घेणार आहेत. प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: