
लग्न म्हणजे सात जन्माचं बंधन. लग्न करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असते. सर्वांसाठी तो आनंदाचा क्षण असतो. अनेक लग्नाळू लग्न व्हावे यासाठी प्रयत्नशिल असतात. असा वेळी त्यांची फसवणूकही अनेक वेळा झाली आहे. अशा घटनाही समोर आल्या आहेत. पण आपली कोणी फसवणूक करत आहे याची साधी कल्पनाही त्यांना येत नाही. लग्नाचे आपले स्वप्न साकार झाले या धुंदीतच ते असतात. पण ज्यावेळी ही धुंद उतरते तेव्हा त्यांना मोठा झटका बसतो. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर इथे घडली आहे. इथे एका नववधूने नवऱ्याच्या अंगावरीच हळद उतरण्याच्या आतच त्याला चुना लावण्याची घटना घडली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज इथं एक तरूण लग्नाची स्पप्न पाहात होता. त्यावेळी त्याला एका मुलीची आई भेटली. तिचे नाव मीरा गिरी असे होते. आपली मुलगी सुंदर आहे. मात्र तिला वडील नाहीत. तिच्या लग्नाची जबाबदारी तिचे चुलते कुंडलिक चव्हाण यांनी घेतली आहे. असे तिने मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला सांगितले. शिवाय आपण लग्नास तयार आहोत. मात्र हुंडा देण्याची आपली परिस्थिती नाही असे मीरा गिरीने सांगितले.
ट्रेंडिंग बातमी - उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?
लग्नासाठी मुलगी तयार आहे हे सांगताना त्यांनी अजून एक अट मुलाच्या घरच्यांना टाकली. ती म्हणजे लग्ना आधी तुम्हाला 3 लाख रूपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तुम्हाला हवे तिकडे तुम्ही लग्न लावू शकता. मुलगी देखणी असल्याने आणि मुलाचे लग्न होत नसल्याने मुलाकडच्यांनी ही पैसे देण्याचे मान्य केले. त्यांनी आधी मुलीच्या घरच्यांना 50 हजार देवू केले.लग्न लागल्यानंतर उरलेले अडीच लाखही देण्यात आले.
ट्रेंडिंग बातमी - पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले
त्यानंतर बनावट आधारकार्डाच्या आधारे लग्न लावून देण्यात आले. पहिले काही दिवस नववधू मुलाच्या घरी राहीली. पण एक आढवडा झाल्यानंतर ती कोणाला काही समजण्या आत गायब झाली. तिचा शोध घेण्यात आला. पण ती सापडली नाही. त्याच वेळी आपली फसवणूक झाली आहे हे नवरदेवाच्या घरातल्यांना समजले. त्यांनी तातडीने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाणे गाठले. झालेली घटना सांगितली. त्यानंतर तक्रारही दाखल केली. या प्रकरणी 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक मनोज शिंदे हे करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world