जाहिरात

बारामतीतील 2 अल्पवयीन मुलींना दारू पाजून 4 जणांचा अत्याचार

धक्कादायक बाब म्हणजे या दोन ही मुलींवर अत्याचार करण्या आधी त्यांना दारू पाजण्यात आली. त्यानंतर आळीपाळीने चार जणांनी त्यांच्यावर अत्याचार केले.

बारामतीतील 2 अल्पवयीन मुलींना दारू पाजून  4 जणांचा अत्याचार
पुणे:

अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नाही. आता बारामतीतल्या दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसर परिसरात सामुहीक अत्याचाराची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या दोन ही मुलींवर अत्याचार करण्या आधी त्यांना दारू पाजण्यात आली. त्यानंतर आळीपाळीने चार जणांनी त्यांच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पोलीसांनी तीन जणांना अटक केली असून एक जण फरार आहे. ज्ञानेश्वर आटोळे,अनिकेत ऊर्फ यश बेंगारे आणि सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बारामती न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

14 सप्टेंबरला दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलीस स्थानकात देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या दोन ही मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववी इयत्ते शिकत होत्या. मात्र त्यांची शाळा जरी वेगळी असली तरी त्या एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होत्या. त्या 14 सप्टेंबरला राहत्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या. 

ट्रेंडिंग बातमी - स्वप्नात हत्या झाल्याचे पाहिले, पोलिसांना सांगितले, घटनास्थळी जाताच पोलीसही चक्रावले

पुढे बसने त्या पुण्यात पोहोचल्या. जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. त्याने हडपसर परिसरातील दोघा मित्रांना या मुली येत असल्याचे सांगितले. मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. तिथे रात्री त्यांना दारु पाजून पाजण्यात आली. त्यानंतर  त्या तिघांसह अन्य एका फरार आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले. 

ट्रेंडिंग बातमी - नाशिकमधल्या घटनेची धुळ्यात पुनरावृत्ती, आई-वडिलांनी घेतला भयंकर निर्णय

या घटनेनंतर यामुली हादरून गेल्या होत्या. यातील एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची तातडीने माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले.  गायब झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे  16 तारखेला या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्याला दारू पाजण्यात आली. शिवाय लैंगिक शोषणही करण्यात आल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर तातडीने पावलं उचलत  ज्ञानेश्वर याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून अन्य आरोपींची नावे मिळाला. पुढे बेंगारे व सोन्या आटोळे या दोघांना अटक करण्यात आली. या प्रकरणातील चौथा आरोपी अजून फरार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
नाशिकमधल्या घटनेची धुळ्यात पुनरावृत्ती, आई-वडिलांनी घेतला भयंकर निर्णय
बारामतीतील 2 अल्पवयीन मुलींना दारू पाजून  4 जणांचा अत्याचार
Anna Sebastian Perayil Ernst & Young employee sudden death Shobha karandlaje X post
Next Article
Anna Sebastian Perayil : अ‍ॅनाच्या मृत्यूमागचे गूढ आता उलगडणार, केंद्रीय मंत्र्याने उचलले मोठे पाऊल