शेजार चांगला मिळणं हे अनेकांच्या नशिबी नसतं. चांगले शेजारी असले तर ते सुखदुखात सहभागी होतात आणि अडचणींच्या समयी खंबीर आधार बनून पाठीशी उभे राहतात. मात्र शेजार चांगला नसेल ततर काय होतं याचं उत्तम उदाहरण नवी मुंबईत पाहायला मिळाले आहे. सप्टेंबर महिन्यात घडलेल्या एका प्रकारामुळे पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे. मोनिका दिघे असं या महिलेचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नक्की वाचा: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!
बाई, काय हा प्रकार!!
सप्टेंबर महिन्यात नवी मुंबईतील कामोठे सेक्टर-35 मध्ये खळबळ उडाली होती. इथल्या जेम्स सोसायटीमध्ये राहणारे म्हसकर कुटुंब प्रचंड घाबरलं होतं. त्यांच्या घरातून 22 तोळे सोनं (अंदाजे किंमत 2,39,400 रुपये) चोरीला गेलं होतं. चोरीची बातमी कळाल्यानंतर म्हसकर कुटुंबाच्या शेजारी राहणारी मोनिका दिघे ही या कुटुंबाला धीर द्यायला धावली होती. पोलीस नक्की आरोपी पकडून आणतील, असं म्हणत तिने म्हसकर कुटुंबाला शांत करण्याचा प्रयत्न केला. 27 सप्टेंबरला म्हसकर कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली होती, मात्र त्याच्या 10 दिवस आधी चोरीची घटना घडली होती.
नक्की वाचा: प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी छळ, IAS अधिकाऱ्याच्या मुलीने संपवलं जीवन
तपास अधिकारी बदलताच तपासाची चक्रे फिरली
चोरीच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली, मात्र फार काही प्रगती होत नव्हती. पोलीस प्रशासनाने या घटनेचा तपास अधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर मात्र सगळ्या गोष्टी वेगाने घडत गेल्या. पोलिसांनी तपासाला नव्याने सुरूवात केली. सगळ्यांना संशयाच्या नजरेतून पाहात, कोणाचं वर्तन वेगळं वाटतंय का हे पोलिसांनी बघण्यास सुरूवात केली. पोलिसांना मोनिकावर संशय आल्याने त्यांनी तिचं बँक अकाऊंट तपासलं. सोबतच तांत्रिक तपासाद्वारे दागिने कुठे विकलेत हे शोधण्यास सुरूवात केली. मुंबईमध्ये याचे धागेदोरे पोहोचल्याचं कळाल्यानंतर पोलिसांनी माग शोधून काढत ही चोरी मोनिकानेच केल्याचं निष्पन्न केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world