जाहिरात

Pune Crime : हगवणेंचा आणखी एक फ्रॉड, जेसीबी हडपण्यासाठी रचला कट; स्वत: नेमला बँकेचा रिकव्हरी एजंट

हगवणे कुटुंबाचे नवनवे प्रताप दिवसागणिक समोर येत आहेत. आता जेसीबी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pune Crime : हगवणेंचा आणखी एक फ्रॉड, जेसीबी हडपण्यासाठी रचला कट; स्वत: नेमला बँकेचा रिकव्हरी एजंट

हगवणे कुटुंबाचे नवनवे प्रताप दिवसागणिक समोर येत आहेत. सध्या जेसीबी प्रकरणात वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान जेसीबी प्रकरणात इंडसइंड बँकेचीही चौकशी करण्यात आली. या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडेकडून जप्त केला नाही, असा खुलासा इंडस इंड बँकेने केला आहे. त्यामुळे हगवणेंचा पाय अधिक खोलात गेला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकाने कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर आलं आहे.  शशांक आणि लता हगवणे यांनी स्वत:च बँकेच्या नावाखाली भामटे एजंट नेमले आणि येळवंडेंकडे पाठवल्याचं समोर आलं आहे. म्हणजे हगवणे माय-लेकांनी जप्त केलेला जेसीबी ज्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवला त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी ही हगवणेंची पोलखोल केली आहे. येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत पोहचलाच नाही, अशी माहिती खांडेभराड यांनी पोलीस चौकशीत दिली आहे.

नक्की वाचा - Vaishnavi Hagawane death : हगवणेंभोवतीचा फास अधिक घट्ट, JCB विक्री प्रकरणात इंडसइंड बँकेची चौकशी

त्यामुळं येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे ही हगवणेची माणसं होती अन् हा कटाचा भाग होता. या शंकेवर आता जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. या चौकशीतून लता आणि शशांक या माय-लेकाचे पाय आणखी खोलात गेला आहे. आता म्हाळुंगे पोलिसांकडून जेसीबी जप्त करायला आलेल्यांचा शोध सुरू केला आहे.

जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण काय आहे? 
मिळालेल्या माहितीनुसार, लता आणि शशांक हगवणे यांनी प्रशांत येळवंडे याला जेसीबीची विक्री केली होती. हा जेसीबी मुळात इंडसइंड बँकेकडून हफ्त्याने घेण्यात आला होता. त्याचे हफ्ते सुरू असतानाच हगवणे कुटुंबीयांनी येळवंडे यांना जेसीबीची विक्री केली. यासाठी त्यांनी येळवंडेकडून 11 लाख 70 हजार घेतले. मात्र मुळात त्यांनी बँकेचं लोन फेडलं नाही. यानंतर काही दिवसांनी बँकेने हा जेसीपी जप्त केला. शशांक हगवणे यांनी पैसे देण्याच कबुल केलं, मात्र प्रत्यक्षात पैसे दिले नसल्याचा आरोप येळवंडेंकडून केला जात आहे. बँकेने जप्ती आणलेला जेसीबी काही दिवसांनी शशांक हगवणेंच्या घराजवळ आढळल्याने अनेक सवाल उपस्थित झाले आहे. त्यामुळे प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्ती आणलेला जेसीबी गोडाऊनमधून जप्त कसा झाला? यासंदर्भात बँकेची चौकशी करण्यात आली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com