जाहिरात

बायको पळून गेल्यावर नवऱ्याची सटकली!मेव्हणीसोबत केलं सर्वात भयंकर कृत्य, पुतणीलाही सोडलं नाही

बायको पळून गेल्यावर नवऱ्याची सटकली!मेव्हणीसोबत केलं सर्वात भयंकर कृत्य, पुतणीलाही सोडलं नाही
Man Killed Sister In Law
मुंबई:

Man Killed Sister In Law Crime News :  विवाहबाह्य संबंधातून कुटुंबात कलह निर्माण झाल्याच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याच्या संतापजनक घटनाही घडल्या आहेत. अशातच राजधानी दिल्लीतील ख्याला परिसरातही नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. इस्तेखार अहमद उर्फ बब्बू नावाच्या व्यक्तीने त्याच्या मेव्हणीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आणि तिच्या मुलीची बोटं कापली. इतकच नव्हे तर आरोपीने एका नातेवाईक महिलेवरही हल्ला केला. पत्नीला परपरुषासोबत पळून जाण्यासाठी नातेवाईकांनी मदत केली होती, असा संशय आरोपी बब्बूला होता. त्यामुळे बब्बूने हत्येसारखा भयंकर गुन्हा केला. 

नेमकं काय घडलं?

रिपोर्टनुसार, पश्चिम दिल्लीच्या ख्याला परिसरात असलेल्या जे जे कॉलनीत ही खळबळजनक घटना घडली. त्यानंतर उस्मान नावाच्या व्यक्तीने पोलिसांना कॉल केला आणि हत्येच्या घटनेबाबत माहिती दिली. उस्मानने पोलिसांना माहिती दिली की, आरोपी बब्बू गाजियाबादच्या लोनी येथील रहिवासी असून तो एक सेक्युरिटी गार्ड आहे. त्याने घरात घुसून महिलांवर हल्ला केला. 

बब्बू सकाळी 7 वाजता नुसरतच्या घरी पोहोचला होता. त्याने टिफिन बॉक्समध्ये धारदार शस्त्र लपवले होते. जेव्हा नुसरतने बब्बूला चहा पिण्याबाबत विचारलं, तेव्हा त्याने अचानक नुसरतवर हल्ला केला. त्यानंतर नुसरत गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. पण, नुसरतची मुलगी सानियाने तिच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपी बब्बूने तिचं बोट कापलं आणि डोक्यावरही वार केला. त्यानंतर बब्बूने त्याचा नातेवाईक अकबरीवरही हल्ला केला.

नक्की वाचा >> आजारी पडलेल्या सुनेला सासऱ्याने पीठ मळून दिलं, मुलाने पाहिलं अन् नंतर असं काही केलं..व्हायरल Video पाहून सर्वच झाले थक्क

पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि नुसरतचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. जखमी झालेल्या सानिया आणि अकबरीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी बब्बूला अटक केली असून त्याच्याकडे असणारे शस्त्रही जप्त केले आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 103(1) आणि 109(1) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. 

काय होतं हत्येमागचं कारण?

पोलिसांच्या प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, बब्बू आणि त्याच्या पत्नीत वादविवाद सुरु होते. बब्बूला संशय होता की, त्याची पत्नी परपुरुषासोबत पळून गेली आणि नुसरतसह अन्य नातेवाईकांनी तिला पळून जाण्यास मदत केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं की, नुसरतने पत्नीला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप बब्बूने केला होता.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com