
Family Good Relationship Viral Video : सुखी संसार थाटण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महिलांना सासरच्या घरी मान-सन्मान मिळेलच,याचा काही भरवसा नाही. कारण सासरच्या घरी अनेक महिलांना हुंड्यासाठी असो किंवा घरगुती हिंसाचाराला बळी पडावं लागतं. पण काही कुटुंब या परिस्थितीला अपवाद असू शकतात. म्हणजेच काही लोक त्यांच्या घरात असलेल्या सुनेला मुलीसारखं मानतात.जणू काही संस्काराच्या शिदोरीतील उत्तम गुणदर्शनच कुटुंबातील लोक घडवत असतात. असाच एका कुटुंबाचा जबरदस्त किस्सा व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आला आहे. कुटुंबातील सून आजारी झाल्यावर तिला कशाप्रकारे मदत करता येईल, याचं उत्तम उदाहरण तिच्या सासऱ्यानं दाखवून दिलंय. सासऱ्याने त्याच्या सुनेला पीठ मळून देण्यात कशाप्रकारे मदत केली, याचा व्हिडीओ महिलेच्या मुलानं बनवला आणि तो इन्स्टाग्रामवर शेअर केला.
व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की, मुलगा मोबाईलमध्ये कॅमेरा सुरु करून पत्नीचा आणि सासऱ्याचा व्हिडीओ बनवतो. एकीकडे सून बसली आहे आणि दुसरीकडे सासरा पीठ मळत आहे, असं तो म्हणतो. त्यानंतर सासरा त्यांच्या सुनेची बाजू घेत मुलाला म्हणतो, तिच्या हाताला लागलंय. त्यामुळे घरातील माणसांनी सुनेला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. जर आपण एकमेकांना सपोर्ट केला नाही,तर घरात सुख-समृद्धी कशी नांदणार..असंही सासरे त्यांच्या मुलाला सांगतात.इंटरनेटवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी लाईक्स आणि प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
इथे पाहा व्हायरल व्हिडीओ
व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
व्हिडीओ शेअर करत सुनेनं म्हटलंय की, मुलाने रील बनवली आहे म्हणून तुम्हाला हा व्हिडीओ पाहता आला आहे.ते आधीपासूनच माझी मदत करतात. या व्हिडीओला कमेंट करत एका यूजरने म्हटलंय, 'सासरे अनुभवी आहेत.तुम्हालाही वेळेनुसार शिकावं लागेल'. दुसऱ्या यूजरने म्हटलंय, 'कोणी हा व्हिडीओ पाहत असतील, त्यांनी त्यांच्या वडिलांना मदत करावी. या कुटुंबातील सासरे संस्कारी आहेत'.तिसऱ्या यूजरने म्हटलंय, अशी सौभाग्यवती सर्वांना मिळो. अन्य एका यूजरने म्हटलंय, सासराही बापच असतो. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओला 4 लाख 70 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world