जाहिरात

नवी मुंबईच्या बड्या राजकीय नेत्याला ब्लॅकमेल करण्यासाठी महिलेचा वापर! मुंबईतील वकिलाला अटक

नवी मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण उघड करत मुंबईतील बड्या वकिलाला अटक केली आहे.

नवी मुंबईच्या बड्या राजकीय नेत्याला ब्लॅकमेल करण्यासाठी महिलेचा वापर! मुंबईतील वकिलाला अटक
प्रतिकात्मक फोटो
नवी मुंबई:

राहुल कांबळे, प्रतिनिधी

नवी मुंबई पोलिसांनी एक धक्कादायक प्रकरण उघड करत मुंबईतील बड्या वकिलाला अटक केली आहे. या वकिलानं सध्या सध्या ऐरोलीत राहणाऱ्या एका 29 वर्षीय तरुणीवर अंधेरीतील एका वकिलाने त्याच्या कारमध्ये लैंगिक अत्याचार करून त्याचे स्पाय कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर या वकीलाने सदरचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित तरुणीला नवी मुंबईतील एका बड्या राजकीय नेत्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्यास भाग पाडली. त्या नेत्याकडून पीडित तरुणीच्या नावाने तब्बल 2 कोटी 70 लाख रुपये उकळल्याचे देखील  तपासात स्पष्ट झालं आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे प्रकरण?

अली काशीफ खान देशमुख असं या आरोपी वकिलाचं नाव आहे. नवी मुंबईच्या रबाळे पोलिसांनी  त्याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली आहे.  या प्रकरणातील २९ वर्षीय तक्रारदार तरुणी आईसह ऐरोलीत राहण्यास असून, वर्षभरापूर्वी तिने आपल्या आईच्या घटस्फोट प्रकरणात अंधेरी येथील वकील अली काशीफ खान देशमुख याची भेट घेतली होती. 

या तरुणीचे नवी मुंबईतील बड्या राजकीय नेत्यासोबत चांगली ओळख असल्याचे या वकिलाला समजले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये रात्री उशीरा खानने ऐरोलीत पीडित तरुणी राहत असलेल्या भागात आला होता. त्यावेळी त्याने पीडित तरुणीला कोल्ड्रिंकमधून गुंगीचं द्रव्य पाजून तिच्यावर कारमध्येच जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले.

( नक्की वाचा : पुण्यातल्या मुलाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं Blue Whale Challenge काय आहे? या खेळात स्पर्धक जीव का देतात? )

आरोपी खानने या प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास पीडित तरुणी आणि तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच कारमध्ये केलेल्या लैंगिक अत्याचाराचे स्पाय कॅमेऱ्याद्वारे केलेल्या चित्रीकरणाचा व्हिडीओ व्हायरल करण्याचा धाकही दाखवला होता.

खान एवढ्यावरच थांबला नाही. त्यानं फेब्रुवारी महिन्यामध्ये सदरचे व्हिडीओ प्रसारीत करण्याची धमकी देऊन पीडित तरुणीला नवी मुंबईतील बडा राजकीय नेता आणि त्याच्या मुलाविरोधात  अंबोली पोलीस ठाण्यात बलात्काराची खोटी तक्रार देण्यास पाठवून दिले होते. अखेर पीडित तरुणीने रबाळे पोलीस ठाणे गाठून वकील अली खान विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. खानला  स्थानिक दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यांनी त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
बदलापूरात वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर अत्याचार, गुंगीचे औषध देणाऱ्या मैत्रीणीसह तिघांना अटक
नवी मुंबईच्या बड्या राजकीय नेत्याला ब्लॅकमेल करण्यासाठी महिलेचा वापर! मुंबईतील वकिलाला अटक
West Bengal woman doctor rape and murder a broken earphone led to the shocking case
Next Article
रात्रभर CCTV चा तपास, तुटलेल्या इयरफोनमुळे मिळाली टीप, कलकत्ता हत्याकांडात आरोपीला कशी झाली अटक?